Navratri Utsav | मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी केली मुंबादेवीच्या चरणी प्रार्थना, म्हणाले – ‘कोरोनाचे सावट कायमसाठी जाऊ दे’ (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  Navratri Utsav | मागील दिड वर्षापासून कोरोनामुळे सर्वच मंदिरे बंद होती.मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यापासून मंदिरे सुरु व्हावीत अशी अपेक्षा भक्तभाविकांची होती. या पार्श्वभुमीवर कोरोनाची आटोक्यात आलेली परिस्थिती बघता राज्य सरकारने मंदिरे खुली करण्याचा निर्णय घेतला. शासनाच्या नियमांनूसार नवरात्रीच्या सुरुवातीला मंदिरे सुरु (Temples started) झाली. आज (गुरुवारी) नवरात्रीच्या (Navratri Utsav) शुभमुहूर्तावर मंदिरे सुरु झाल्याने भाविकांच्यात आनंद दिसून येतोय. त्यातच आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे कुंटुंबासोबत सकाळीच मुंबादेवी येथे दर्शन घेतले आहे.

दर्शन घेतेवेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, कोरोनाचे सावट कायमसाठी जाऊ दे, अशी प्रार्थना मुंबादेवीच्या चरणी आपण केली असून,
आपली मंदिरे आणि प्रार्थनास्थळे भक्तांसाठी खुली होत आहेत.
धार्मिक स्थळांवर आरोग्याच्या नियमांचे काटेकोर पालन करणे सुरूच ठेवण्याची जबाबदारी सर्वांनी पार पाडली पाहिजे.
माझी सर्व जनतेला आणि भक्तांना विनंती आहे की, आनंदात राहा, मात्र, कोरोनाचे नियम पाळून सुरक्षित राहा, तसेच त्यांनी सर्व भक्तांना शुभेच्छाही दिल्या आहेत.
त्यावेळी पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) , पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) उपस्थित होत्या.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिद्धिविनायक तसेच इतरही काही प्रमुख मंदिरांमध्ये क्यूआर कोड व तंत्रज्ञान वापरून दर्शन व्यवस्था केल्याबद्धल कौतूक केले आहे.
दरम्यान, आज मंदिरे खुली झाली आहे.
त्यांनतर आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar) यांनी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले. (Navratri Utsav)

 

Web Title : Navratri Utsav | cm uddhav thackeray visits mumbadevi mandir his family ghatasthapana navratri

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune News | नवरात्री उत्सवाच्या मुहूर्तावर आजपासून धावणार हडपसर-मोरगाव पीएमटी

Accident News | उत्तर प्रदेशच्या बाराबंकी येथे बस-ट्रकची समोरासमोर धडक; 8 जणांचा जागीच मृत्यू

Ajit Pawar | अजित पवारांशी संबंधीत साखर कारखान्यांवर आयकर विभागाचे छापे, उपमुख्यमंत्री म्हणाले…