‘बिग बी’ अमिताभची नात नव्या नवेलीनं शेअर केला ‘असा’ फोटो ! मीजान जाफरी म्हणाला…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडचे मेगास्टार बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची नात नव्या नवेली नंदा (Navya Naveli Nanda) सोशल मीडियावर कायमच ॲक्टीव्ह असते. आपल्या फोटो आणि व्हिडीओंमुळं ती अनेकदा चर्चेतही आली आहे. अभिनेता जावेद जाफरी (Javed Jaffrey) चा मुलगा ॲक्टर मीजान जाफरी (Mizaan Jaffrey) सोबत ती अनेकदा स्पॉट झाली आहे. एकदा तर मीजान तिच्या सोबत असताना कॅमेऱ्यासमोर आल्यानंतर टीशर्टनं चेहरा लपवताना दिसला होता. पुन्हा एकदा फोटोमुळं ही जोडी चर्चेत आली आहे.

नव्यानं तिच्या इंस्टावरून एक फोटो शेअर केला आहे. या ती छातावर बसल्याचं दिसत आहे. हा फोटो सध्या चाहत्यांमध्ये चर्चेत आहे. फोटो समोर आल्यानंतर अनेकांनी यावर कमेंट करत तिचं कौतुक केलं आहे. पंरतु मीजानच्या कमेंटनं खास लक्ष वेधून घेतलं.

https://www.instagram.com/p/CJQgaFrsvpS/

मीजाननं कमेटं करत लिहिलं की, तुझा चेहरा दाखवू शकतेस का. यासोबत त्यानं हार्ट इमोजीही पोस्ट केली आहे. सध्या फोटोएवढीच त्याच्या कमेंटचीही चर्चा सुरू आहे.

मीजानची ही कमेंट पाहून दोघांत काय शिजत आहे असा सवाल अनेकांनी केला आहे. सध्या नव्याचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

मीजानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर संजय लीला भन्साळी यांच्या मलाल या सिनेमातून त्याने करिअरला सुरुवात केली. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चालला नाही. त्याला आवाजवरूनही लोकांनी ट्रोल केलं आहे. मीजानचा रोल पाहिल्यानंतर काहींनी असेही म्हटले की, तो संजय दत्तला कॉपी करत आहे.