Nawab Malik | नवाब मलिक यांच्या आरोपानंतर समोर आली धक्कादायक माहिती; समीर वानखेडेंची मेहुणी हर्षदा रेडकरवर पुण्यात ‘हा’ गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे नेते आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी एनसीबीचे (NCB) अधिकार समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर आणखी एक गंभीर आरोप केला आहे. यावेळी आरोप करताना नवाब मलिक (Nawab Malik) यांनी वानखेडे यांच्या मेहुणी (sister-in-law) संदर्भात सवाल उपस्थित केला आहे. परंतु आता या संदर्भात मोठी अपडेट समोर येत आहे.

 

हा गुन्हा दाखल

 

समीर वानखेडे यांच्या प्रकरणांमध्ये नवाब मलिक (Nawab Malik) यांनी क्रांती रेडकर (Kranti Redkar) यांची बहिण हर्षदा रेडकर (Harshda Redkar) हिच्या संदर्भात एक खुलासा केला.
यावेळी त्यांनी पुणे पोलिसांनी (Pune Police) 2008 मध्ये हर्षदा रेडकरविरोधात अंमली पदार्थांच्या विरोधातला गुन्हा (FIR) दाखल आहे.
असे म्हटले आहे. परंतु प्रत्यक्षात हा वेगळयाच (पिटा अ‍ॅक्ट) कलमान्वये दाखल झाला असल्याची नोंद पुणे पोलिसांच्या अभिलेखावर आहे.

 

नवाब मलिकांचा नवा आरोप

 

नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांना ट्विट करुन विचारले आहे की, तुमची मेहुणीही ड्रग्जच्या व्यवसायात (drug business) आहे का? मलिका यांनी नावा दावा केला आहे की,
समीर वानखेडे यांची मेहुणी हर्षदा दीनानाथ रेडकर यांच्यविरुद्ध पुणे न्यायालयात (Pune court) ड्रग्जचा खटला सुरु आहे.
नवाब मलिकांनी या मुद्यावर समीर वानखेडे यांच्याकडे उत्तर मागितले आहे.
तसेच याचा पुरावा असल्याचे ट्विट मलिकांनी केला आहे.

 

वानखेडेंचे प्रत्युत्तर

 

नवाब मलिक यांनी केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना समीर वानखेडे यांनी म्हटले की, जानेवारी 2008 मध्ये जेव्हा हे प्रकरण घडले तेव्हा मी सेवेतही नव्हतो.
मी 2017 मध्ये क्रांती रेडकरशी लग्न केलं. मग तरीही मी या केसशी कसा जोडला जातोय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

 

Web Title : Nawab Malik | case filed against kranti redkar sister harshda redkar in 2008 is pita act nawab malik sameer wankhede

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Dnyandev Wankhede | ज्ञानदेव वानखेडेंचा नवाब मलिक यांच्याविरोधात दावा; उच्च न्यायालयाने दिले महत्वाचे निर्देश

Sinhagad Fort | गेल्या चार दिवसांत 25 हजार पर्यटक सिंहगडावर

MLA Gopichand Padalkar | ‘शरद पवार अन् जयंत पाटलांकडून मला संपविण्याचा कट’ – गोपीचंद पडळकर