Nawab Malik | दिवाळीनंतर राजकीय बॉम्बस्फोट सुरुच ! BKC त सापडलेल्या 14 कोटींच्या बनावट नोटांशी देवेंद्र फडणवीसांचं ‘कनेक्शन’, नवाब मलिकांचा घणाघाती आरोप (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) पुत्र आर्यन खान याच्या (Aryan Khan) क्रुझ डग्ज प्रकरणावरुन (Mumbai Drugs Case) सुरु झालेल्या आरोपप्रत्यारोपाचा खेळ आता राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात सुरु झाला आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांनी १४ कोटी रुपयांच्या बनावट नोटांचे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला असून त्यात त्यांचा हात असल्याचा आरोपी मलिक (Nawab Malik) यांनी केला आहे. इतकेच नाही तर मुख्यमंत्री असताना फडणवीस यांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना मोठमोठ्या पदावर बसवल्याचा आरोप केला आहे.

 

 

नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटबंदी झाली तेव्हा मोदीजींनी सांगितले की, दहशतवाद, काळा पैसा संपविण्यासाठी नोटबंदी लागू करत आहे. नोटबंदीनंतर देशाच्या विविध भागात बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. मध्य प्रदेश, तामिळनाडुत बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. पण ८ ऑक्टोबर २०१७ म्हणजे जवळपास १ वर्षांपर्यंत राज्यात एकही बनावट नोटांचे प्रकरण समोर आले नाही. ८ ऑक्टोबर २०१७ रोजी मुंबईतील BKC त एक छापेमारी झाली. त्यात १४ कोटी ५६ लाख रुपये पकडले. हे प्रकरण दाबण्यासाठी फडणवीस यांनी मदत केली.

बनावट नोटांचे (Fake Note) कनेक्शन हे आयएसआय (ISI), पाकिस्तान (PAK), दाऊद (Dawood) व्हाया बांगला देशामार्फत देशभरात पसरवले जात आहे. ८ ऑक्टोबरला १४ कोटी ५६ लाख रुपये पकडले गेले. १४ कोटींच्या बनावट नोटा जप्त केल्या गेल्या. प्रत्यक्षात ८ लाख ८० हजार रुपये दाखविले गेले.

 

बनावट नोटा प्रकरणातील आरोपी इमरान (Imran) हा हाजी अराफत (Haji Arafat) याचा भाऊ असून
तत्कालीन सरकारचा वरदहस्त असल्याने हे प्रकरण दाबले गेले.
फडणवीस यांच्याकडून हाजी अराफत याला मंडळाचे अध्यक्षपद दिले गेले.
हत्येचा आरोप असलेल्या मुन्ना यादव (Munna Yadhav) याला फडणवीस यांनी बांधकाम कामगार मंडळाचे अध्यक्ष बनवले,
असा आरोपी मलिक (Nawab Malik) यांनी फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर केला आहे.

 

 

Web Title :- Nawab Malik | Political bomb blasts continue after Diwali! BJP Leader Devendra Fadnavis’s ‘connection’ with fake Rs 14 crore notes found in BKC, NCP Leader Nawab Malik’s scathing allegations (video)

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा