सुशांत सिंह आत्महत्या प्रकरण : ड्रग्ज प्रकरणात NCB कडून आणखी एकाला अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाची अद्याप चौकशी सुरु आहे. गेल्या वर्षी 14 जूनला मुंबईतील अपर्टमेंटमध्ये सुशांतचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) गुरुवारी (दि.4) आणखी एकाला अटक केली आहे. एसनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, जगताप सिंग आनंद याला पुन्हा अटक केली आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, जगताप सिंग आनंद याला पुन्हा अटक करण्यात आली असून त्याचा यापूर्वी अटक करण्यात आलेल्या करमजीत सिंग याच्यासोबत संबंध असल्याचे समोर आले आहे. जगताप सिंग आनंद याला यापूर्वी ड्रग्ज पेडलिंग संदर्भात अटक करण्यात आली होती. सुशांत सिंग आत्महत्येनंतर समोर आलेल्या ड्रग्ज प्रकरणात बॉलिवूडमधीलच राहील फर्निचरवाला आणि व्यावसायिक करण सजनानी यांना चौकशीसाठी एनसीबीने ताब्यात घेतले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासादरम्यान अनेक अमली पदार्थ तस्करांची नावे समोर आली होती. त्यामध्ये बॉलिवूडमधील कलाकारांना अमली पदार्थ पुरविणाऱ्यांबरोबरच काही कलाकारांचीदेखील चौकशी करण्यात आली होती. याच प्रकरणात आता सुशांतचा मित्र आणि सहाय्यक दिग्दर्शक ऋषिकेश पवार याला एनसीबीने ताब्यात घेतले आहे. ऋषिकेश सुशांतला ड्रग्ज पुरवत होता, असा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून एनसीबीनं त्याला चौकशीसाठी समन्स बजावले होते. पण अनेकवेळा नोटीस पाठवून देखिल ऋषिकेश सहकार्य करत नव्हता.