अर्जुन रामपालला NCB कडून पुन्हा एकदा ‘समन्स’ ! उद्या होणार चौकशी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) केसमध्ये ड्रग्ज अँगलचा तपास करणाऱ्या नारकोटीक्स कंट्रोल ब्युरोनं (NCB) पुन्हा एकदा बॉलिवूड ॲक्टर अर्जुन रामपाल ( (Arjun Rampal) ला समन्स पाठवलं आहे. आता सुशांत केसमधील ड्रग्ज अँगल प्रकरणी त्याची चौकशी केली जाणार आहे. आता 16 डिसेंबर रोजी अर्जुन चौकशीसाठी एनसीबी समोर हजर राहण्याची शक्यता आहे.

गेल्या वेळीच अर्जुनची चौकशी झाली होती. यानंतर तो म्हणाला होता की, ड्रग्जशी माझा काहीही संबंध नाही. परंतु एनसीबी या प्रकरणी जे काही काम करत आहे ते बरोबर आहे. आता एनसीबीला खात्री पटली आहे की, या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही.

यापूर्वी ड्रग्ज बाळगणं आणि त्याची खरेदी विक्री करणं या गुन्ह्यात अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रिएड्स (Gabriella Demetriades)चा भाऊ अगिसियालोस डेमेट्रिएड्स (Agisilaos Demetriades) याला एनसीबीनं पुन्हा एकदा ताब्यात घेण्यात आलं होतं. अशी माहिती आहे की, त्याला या केसमध्ये ताब्यात घेतल्यानंतर जामीन मिळाला होता. परंतु त्याला एनसीबीनं पुन्हा एकदा ताब्यात घेतलं होतं. धर्मा प्रॉडक्शनचा माजी एक्झिक्युटीव्ह प्रोड्युसर क्षितिज प्रसाद यालाही एनसीबीनं या प्रकरणी अटक केली होती.