NCP Chief Sharad Pawar | राष्ट्रवादीचा पुण्यातील पहिला उमेदवार ठरला! शरद पवारांनी दिले तयारीला लागण्याचे आदेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – NCP Chief Sharad Pawar | राष्ट्रवादीमध्ये अजित पवारांच्या (Ajit Pawar) बंडामुळे उभी फूट पडली आहे. पक्षामध्ये दोन गट पडले असून एक गट सत्तेमध्ये तर एक गट विरोधामध्ये आहे. अजित पवारांच्या बंडामुळे अनेक आमदार, जिल्हाध्यक्ष आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये विभागणी झाली आहे. असे असले तरी देखील आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) हे कामाला लागले असून त्यांची पक्षबांधणी देखील सुरु आहे. आगामी विधानसभा निवडणूकीसाठी पक्षातील नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचे आदेश देण्यात आले आहे. आज मुंबईमध्ये पार पडलेल्या बैठकीमध्ये देखील शरद पवारांनी गेलेल्यांसाठी दरवाजे बंद झाल्याचे सांगून कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. आगामी विधानसभा निवडणूकीच्या (Assembly Elections) पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचा पुण्यातील पहिल्या उमेद्वाराचे नाव समोर आले आहे आणि शरद पवारांनी त्यांना तयारी करण्यास सांगितले असल्याचे बोलले जात आहे.

महाविकास आघाडीमध्ये (Maha Vikas Aghadi) जे काही 70-80 जागा राष्ट्रवादीकडे येतील तिथे जोरदार तयारी करण्याच्या सूचना पक्षाध्यक्षांकडून देण्यात आल्या आहेत. पुण्याला शरद पवारांचा बालेकिल्ला समजला जातो. पुण्यामध्ये राष्ट्रवादीची मोठी फौज तयार आहे मात्र बंडामुळे त्यांची विभागणी झाली असून शरद पवार यांचे निष्ठावंत म्हणून ओळखले जाणारे प्रशांत जगताप हे शरद पवारांच्याच बाजूने आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना बैठकीमध्ये तयारीला लागण्याचे आदेश देण्यात आले आहे. प्रशांत जगताप हे या आधी झालेल्या 2019 च्या विधानसभा निवडणूकीसाठी देखील इच्छुक उमेद्वार होते मात्र तेव्हा चेतन तुपे यांना संधी देण्यात आली. आता मात्र शरद पवार गटाकडून हडपसर विधानसभा मतदारसंघाकडून (Hadapsar Assembly Constituency) निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली असून पक्षश्रेष्ठींनी तयारीचे आदेश देखील दिले आहे.

पुण्यातील हडपसर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे चेतन तुपे (Chetan Tupe) हे सध्या आमदार आहेत. मात्र बंडानंतर त्यांना ‘साहेब की दादा’ यापैकी निवड करता आली नाही. कधी ते शरद पवारांसोबत (NCP Chief Sharad Pawar) दिसतात तर कधी अजित पवारांसोबत दिसून येतात. यामुळे आता शरद पवार गटाकडून प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांना उमेद्वारी देण्यात येणार असल्याच्या चर्चा असून त्यांना तयारीचे आदेश देण्यात आले आहे. पुण्यामध्ये राष्ट्रवादीची मोठी शक्ती एकवटलेली दिसून येत होती. मात्र बंडानंतर अनेकांनी अजित पवारांची साथ दिली. मात्र शरद पवारांसोबतच राहणार असल्याचे सांगणारे प्रशांत जगताप हे पुण्यातील पहिले पदाधिकारी होते. त्यामुळे आता त्यांनी हडपसर विधानसभा मतदारसंघातून संधी मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

निवडणूकीबद्दल बोलताना प्रशांत जगताप म्हणाले की, “पक्षाने 40 लोकांना नोटीस पाठवली आहे.
त्यामुळे संबंधित मतदारसंघामध्ये पक्षाकडून उमेदवार दिले जाणार आहेत. त्यासंदर्भात उमेदवारांची चाचपणी सुरु आहे.
मी हडपसर मतदारसंघामध्ये निवडणूक लढविण्यास इच्छुक असून निवडणूक लढवणार आहे.
2019 मध्ये देखील मी इच्छुक होतो पण संधी मिळाली नाही, मात्र यावेळेस हडपसर लढवणार आणि जिंकणार देखील.”
अशा शब्दांत प्रशांत जगताप यांनी विश्वास व्यक्त केला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Atul Bhatkhalkar | भातखळकर यांचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र; म्हणाले – ’40 आमदार मराठीत काय बोलत होते…’

Pune Police MPDA Action | लोणी-काळभोर परिसरातील हातभट्टी दारुची विक्री करणाऱ्या महिलेवर एमपीडीएची कारवाई! पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 41 वी स्थानबध्दतेची कारवाई