NCP Chief Sharad Pawar | शरद पवार स्पष्टच म्हणाले, ”अजित पवार आणि त्यांच्यासह गेलेल्या आमदारांविषयी आता फेरविचार…”

मुंबई : NCP Chief Sharad Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे (Ajit Pawar Group) काही आमदार कुंपणावर आहेत, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (MP Amol Kolhe) यांनी केले होते. त्यानंतर या आमदारांविषयी तर्कवितर्कांना उधाण आहे. याविषयी खुद्द शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी माघारी येण्याची इच्छा असलेल्या आमदारांबद्दल स्पष्ट शब्दात उत्तर दिले आहे.

शरद पवार म्हणाले, अजित पवार गटात घालमेल सुरु आहे की नाही हे माहीत नाही. पण त्यांच्यासंबंधीची आमची भूमिका स्पष्ट आहे. ज्यांनी हा निर्णय घेतला त्यांच्याबाबत पक्षात फेरविचार होणार नाही. सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेणारे नेते आणि त्यांच्यासह गेलेल्या सगळ्यांना पक्षाचे दरवाजे बंदच असतील. आमची ही स्वच्छ स्वच्छ भूमिका आहे.

अजित पवार यांनी केलेल्या टीकेबाबत शरद पवार म्हणाले, अजित पवारांनी काय बोलायचे त्यावर मी बोलणार नाही. वयाचा उल्लेख ते करु शकतात. मी १९५९ मध्ये राजकीय क्षेत्रात कामाला सुरुवात केली. तेव्हापासून सुट्टी न घेता काम करतो आहे.

पवार पुढे म्हणाले, माझ्या कार्यशैलीवर आणि कार्यपद्धतीवर कधी विरोधकांनीही प्रश्न उपस्थित केला नाही.
वयाचा प्रश्न जे उपस्थित करत आहेत त्यांना सांगू इच्छितो की मोरारजी देसाई हे ८३ व्या वर्षी पंतप्रधान झाले होते.
त्यांच्यामागे लोकांचे बहुमत होते. त्यामुळे अशा गोष्टी काढण्याची आवश्यकता वाटत नाही.

शरद पवार म्हणाले, माझे वय कोणी का दाखवत आहेत त्याच्या खोलात मी जात नाही. माझ्या सर्व सहकाऱ्यांना ठाऊक आहे
की राज्यसभेचा माझा कार्यकाळ अडीच वर्षांनी संपत आहे. त्यानंतर मी राज्यसभेची निवडणूक लढवणार नाही.
त्यावरुन माझी दिशा स्पष्ट आहे. तसेच मुद्दा असा आहे की मी जे जाहीर केले आहे, त्यानंतर तो विषय पुन्हा पुन्हा
का काढायचा?

शरद पवार म्हणाले, लोकांनी मला निवडणून दिले आहे. माझा संसदेतला कार्यकाळ संपलेला नाही तर मी राजीनामा
कसा काय द्यायचा? ही टर्म संपल्यानंतर मी निवडणूक लढवणार नाही असे म्हटले आहे तो कार्यकाळ पूर्ण करणे हे
माझे कर्तव्य आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

अफ्रिकन नागरिकाकडून मेफेड्रोन व मेथाक्युलोन अंमली पदार्थ जप्त, पुणे गुन्हे शाखेची कारवाई

पुणे : मंडळ अधिकाऱ्यांकडे केलेला हरकत अर्ज मागे घेण्यासाठी खंडणीची मागणी, दोघांवर FIR

चालकाला कोयत्याने मारहाण करुन लुटले, दहशत माजवणाऱ्या दोघांना अटक; भोसरी येथील घटना

Radha Krishna Vikhe Patil | तलाठी भरती : मंत्री राधाकृष्ण विखे यांचा विरोधकांना थेट इशारा, सरकारची बदनामी केली तर गुन्हे दाखल करू!

Comedian Navin Prabhakar | कॉमेडियन नवीन प्रभाकर याचा 14 जानेवारीला खास शो रंगणार

Congress Mohan Joshi On Pune Metro | मेट्रो मार्ग तातडीने पूर्ण करा ! संयमाचा अंत पाहू नका, विमानतळापर्यंत मेट्रो सेवा करा – माजी आमदार मोहन जोशी