NCP Chief Sharad Pawar | शरद पवारांनी मराठा आरक्षणावरून सरकारला सुनावले, म्हणाले – ‘जे करणं शक्य नाही त्याचा शब्द कधी देऊ नये, त्यामुळे…’

मुंबई : NCP Chief Sharad Pawar | मनोज जरांगेंनी (Manoj Jarange) दिलेल्या वेळेत आरक्षणावर निर्णय घेऊ, असे आश्वासन सरकारने दिले होते. मात्र, ते आश्वासन पूर्ण झालेलं दिसत नाही. जे करणं शक्य नाही त्याचा शब्द कधी देऊ नये. त्यामुळे आता उपोषण करणाऱ्यांना दोष देता येणार नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनावर व्यक्त केले आहे.

टिकणारे मराठा आरक्षण देण्यासाठी सरकारने मनोज जरांगे यांच्याकडे ३० दिवसांचा वेळ मागितला होता. यावर जरांगेंनी ४० दिवसांचा वेळ राज्य सरकारला दिला. पण ४० दिवसांचा वेळ संपल्यानंतर सरकारने मराठा आरक्षणाच्या मागणीकडे पाठ फिरवल्याने मराठा आंदोलन आता तीव्र झाले आहे. मनोज जरांगे अंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषणाला बसले आहेत तर राज्यभर ठिकठिकाणी साखळी उपोषण आणि राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात येत आहे. यावर शरद पवार यांनी भाष्य केले आहे.

शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) म्हणाले, मनोज जरांगे पाटलांनी काही मागण्या केल्या आहेत. त्या मागण्यांबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मनोज जरांगेंशी सुसंवाद केला. त्यांच्यात प्रत्यक्ष काय बोलणे झाले हे मला माहिती नाही. वर्तमानपत्रावरून जरांगेंनी सरकारला ३० दिवसांचा वेळ दिला. त्यात आणखी काही वाढ झाली.

दरम्यान, काल महाराष्ट्रातील शिर्डी दौऱ्यावर आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मराठा आरक्षणाचा
उल्लेख न केल्याने मनोज जरांगे संतप्त झाले आहेत. मोदींनी भाषणात मराठा आरक्षण आंदोलनाचा उल्लेखही केला नाही,
असं म्हणत आता मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांवर कारस्थान केल्याचा आरोप केला आहे.

मनोज जरांगे म्हणाले, परवा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री दिल्लीला गेले होते. पंतप्रधानांना त्यांनी मराठा आरक्षणाबाबत
सांगितले असेल असे वाटले होते. पण पंतप्रधानांना या दोघांनी मराठा आरक्षण व आंदोलनाबाबत सांगितले नाही अशी
शंका आहे. जर त्यांनी सांगितले असते, तर पंतप्रधानच जाणूनबुजून काल त्यावर काही बोलले नाहीत का?
पंतप्रधानांना गोरगरीबांची गरज राहिली नाही, असा अर्थ महाराष्ट्रातील जनता आता काढायला लागली आहे.

जरांगे म्हणाले, पंतप्रधान बोलले काय किंवा नाही बोलले काय, मराठ्यांना काही फरक पडत नाही.
पण समाज शांत यासाठी होता की पंतप्रधान हा विषय हाताळतील असे समाजाला वाटले होते.
मुख्यमंत्र्यांना हा विषय मार्गी लावण्याबाबत सांगतील असे वाटले होते. पंतप्रधानांच्या बाबतीत मराठ्यांच्या मनात
वैर भावना नव्हती. जर तशी असती, तर पंतप्रधानांचे विमानही शिर्डीत खाली उतरू दिले नसते.
ते वरच्यावर परत पाठवले असते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | मेट्रो कामगारांचे अपहरण करुन रोकड लुटली, पुण्यातील घटना

Lalit Patil Drug Case | तातडीची शस्त्रक्रिया सांगितली असताना ललित पाटील 10 दिवस वेगवेगळ्या शहरात कसा फिरत होता?, रविंद्र धंगेकरांचा सवाल