NCP Chief Sharad Pawar | एकनाथ शिंदेंच्या कर्नाटकातील प्रचारावरुन शरद पवारांचा टोला, म्हणाले – ‘केंद्रातून जो…’

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी (Karnataka Assembly Elections) बुधवारी मतदान होत आहे. या निवडणुकीच्या प्रचारसभेत महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांनी सहभाग घेतला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे देखील प्रचारासाठी कर्नाटकात गेले होते. यावरुन राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी एकनाथ शिंदेंना खोचक टोला लगावला आहे. केंद्रातून जो आदेशे येतो, तो बिचाऱ्या शिंदेंना पाळावा लागतो, असे शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) म्हणाले.

कर्मवीर भाऊराव पाटील (Karmaveer Bhaurao Patil) यांच्या 64 व्या पुण्यतिथी निमित्त मंगळवारी (दि.9) साताऱ्यातील समाधी परिसरात शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी अभिवादन केले. यानंतर ते माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. भाजपमध्ये (BJP) आदेश देण्याची संस्कृती आहे. एकनाथ शिंदे यांना ती मान्य करावीच लागते. केंद्रतून जो आदेश येतो, तो बिचाऱ्या शिंदेंना पाळावा लागतो. शिंदेंचं मुख्यमंत्रीपद भाजपच्या आमदारांवर आहे. त्यामुळे ते कर्नाटकात प्रचारासाठी (Campaigning) गेले, असा टोला शरद पवारांनी शिंदेंना लगावला.

कर्नाटकातील प्रचारात ‘बजरंग बली की जय’ अशी घोषणा देऊन मतं टाका, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी
(PM Narendra Modi) यांनी केलं होतं. यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले, ज्यावेळी आम्ही निवडणूक
अर्ज भरतो. तसेच, निवडून आल्यावर राज्यपाल, सभापती आणि लोकांच्यासमोर आमचा लोकशाही,
धर्मनिरपेक्षतेवर विश्वास आहे, अशी शपथ घेतो. मात्र धर्माच्या आणि जातीच्या नावानं मतं मागणं त्या शपथेचा
भंग आहे. देशाचे पंतप्रधान अशा प्रकारची भूमिका देशासमोर मांडतात, याची मला गंमत वाटते, असं पवार म्हणाले.

Web Title :- NCP Chief Sharad Pawar | sharad pawar taunt eknath shinde over karnataka rally

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन – 75 लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यातील 7 जणांसह इचलकरंजीमधील एकाविरूध्द गुन्हा दाखल

Maharashtra Politics News | काका मला वाचवा म्हणायची अजित पवारांवर वेळ आली, शिंदे गटाच्या खासदाराची टीका

Pune – G20 Summit | पुणे : जी-२० परीषदेच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक संपन्न