NCP Crisis | राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला, शरद पवार गटाला सर्वोच्च न्यायालयात जाण्याची मुभा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – NCP Crisis | जो न्याय शिवसेनेच्या शिंदे गटाला (Shivsena Shinde Group) दिला तोच न्याय आता निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला (Ajit Pawar Group) दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिन्ह आणि पक्षाचा निकाल अजित पवार गटाच्या बाजूने लागला असून हा शरद पवारांना (Sharad Pawar Group) मोठा धक्का मानला जातंय. त्यामुळे येत्या निवडणुकीत शरद पवार गटाला वेगळ्या चिन्हावर आणि नावावर निवडणूक लढवावी लागेल हे स्पष्ट झाले आहे. आयोगाने निकाल देताना शरद पवार गटाला यावर सर्वोच्च न्यायालयात जाण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे आयोगाच्या या निकालाविरोधात शरद पवार गट न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. (NCP Crisis)

राष्ट्रवादीच्या आधी शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हाचा वाद निवडणूक आयोगासमोर होता. त्यावेळी आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाचं असल्याचं सांगत तेच खरी शिवसेना असल्याचे स्पष्ट केलं होतं. त्यानंतर आता अजित पवारांच्या गटाला राष्ट्रवादी चिन्ह आणि नाव दिले आहे. यानंतर आता शरद पवार गटाला त्यांच्या नव्या पक्षाचं नाव आणि चिन्हाची सूचना ही बुधवारी संध्याकाळी चार वाजेपर्यंत द्यावी लागणार आहे.

अजित पवारांकडील संख्याबळ

  • महाराष्ट्रातील 41 आमदार
  • नागालँडमधील 7 आमदार
  • झारखंड 1 आमदार
  • लोकसभा खासदार 2
  • महाराष्ट्र विधान परिषद 5
  • राज्यसभा 1

शरद पवारांचे संख्याबळ

  • महाराष्ट्रातील आमदार 15
  • केरळमधील आमदार 1
  • लोकसभा खासदार 4
  • महाराष्ट्र विधान परिषद 4
  • राज्यसभा – 3

पाच आमदारांनी व एका खासदाराने दोन्ही गटाच्या बाजूने प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Fire News | महंमदवाडी येथील इमारतीच्या 11 व्या मजल्यावर भीषण आग

ACB Trap News | आदिवासी व्यक्तीकडून लाच स्वीकारताना लिपिक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात