ACB Trap News | आदिवासी व्यक्तीकडून लाच स्वीकारताना लिपिक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

ACB Trap News | Senior officer of Public Works Department (Class One) caught in anti-corruption net while taking bribe of six and a half lakhs

गडचिरोली : पोलीसनामा ऑनलाइन – ACB Trap News | आदिवासी व्यक्तीला जमीन विकण्याची परवानगी दिल्याचा मोबदला म्हणून 13 हजार रुपयांची लाच स्वीकारताना (Accepting Bribe) वरिष्ठ लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. ही कारवाई गडचिरोली एसीबीच्या (Gadchiroli ACB News) अधिकाऱ्यांनी सोमवारी (दि.5) संध्याकाळी कुरखेडा येथील उपविभागीय अधिकारी कार्य़ालयात केली. (ACB Trap News)

नागसेन प्रेमदास वैद्य Nagsen Premadas Vaidya (वय 46 ) असे लाच घेताना पकडलेल्या वरिष्ठ लिपिकाचे नाव आहे. याबाबत पळसगाव ता. कुरखेडा जि.गडचिरोली येथील 34 वर्षीय व्यक्तीने गडचिरोली एसीबीकडे तक्रार केली आहे.

तक्रारदार हे आदिवासी असून त्यांना दुसऱ्याला आदिवासी व्यक्तीला जमीन विकायची होती. यासाठी त्यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे रितसर अर्ज केला. त्यानंतर परवानगी मिळाली. मात्र, परवानगी दिल्याचा मोबदला म्हणून वरिष्ठ लिपिक नागसेन वैद्य याने तक्रारदार यांच्याकडे 15 हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडी अंती 13 हजार रुपये स्वीकारण्याचे वैद्य याने मान्य केले. मात्र, तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी गडचिरोली एसीबी कार्यालयात तक्रार दिली.

एसीबीच्या पथकाने सोमवारी संध्याकाळी पडताळणी करुन सापळा लावला.
त्यावेळी वरिष्ठ लिपिक नागसेन वैद्य याला त्याच्याच कक्षात तक्रारदार यांच्याकडून 13 हजार रुपयांची लाच
स्वीकारताना रंगेहाथ पकडून अटक केली. नागसेन वेद्य याच्यावर कारवाई केल्यानंतर एसीबीच्या पथकाने त्याच्या देसाईगंज येथील निवासस्थानाची झडती घेतली.

ही कामगिरी एसीबी नागपूर परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर, अप्पर पोलीस अधिक्षक सचिन कदम,
अप्पर पोलीस अधिक्षक संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली एसीबी गडचिरोलीचे पोलीस उपअधीक्षक अनामिका मिर्झापूरे,
पोलीस निरीक्षक श्रीधर भोसले, पोलीस अंमलदार शंकर डांगे, राजेश पद्मगिरीवार, संदीप घोरमोडे, संदीप उडाण,
चालक प्रफुल डोर्लीकर यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

जुन्या भांडणाच्या कारणावरुन मोठा भाऊ, वहिनीच्या डोक्यात दगड घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

Pune PMC – Swachh Bharat Mission | स्वच्छ भारत मिशनच्या नावाखाली महापालिकेची तिजोरी ‘स्वच्छ’? 600 टन टिपिंग फी दिली जात असताना प्रशासन 875 रुपये टिपिंग फीचा प्रस्ताव मान्य करणार !

तीन अल्पवयीन मुलींसोबत अश्लील कृत्य, नराधमास अटक; कोंढवा परिसरातील प्रकार

Maharashtra Police Suicide News | गळफास घेऊन पोलीस उपनिरीक्षकाची आत्महत्या, प्रचंड खळबळ

पुणे : अश्लील हावभाव करुन महिलेचा विनयभंग, पतीला जीवे मारण्याची धमकी

व्यसनासाठी जमीन विक्रीचा तगादा लावणार्‍या भावाचा खून; शिरुरमधील घोडनदीच्या पात्रात सापडला होता मृतदेह, बीडमधून तिघांना अटक

Total
0
Shares
Related Posts