NCP MP Mohammed Faizal | शरद पवारांना दिलासा, राष्ट्रवादीच्या खासदाराला पुन्हा सदस्यत्व बहाल

 NCP MP Mohammed Faizal | ncp lakshadweep leader mohammed faizal lok sabha membership restored ahead of supreme court hearing
file photo

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) यांची खासदारकी रद्द करण्यात आलेली असताना शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादीला दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. लक्षद्वीपचे (Lakshadweep) राष्ट्रवादीचे खासदार मोहम्मद फैजल (NCP MP Mohammed Faizal) यांची खासदारकी पुन्हा बहाल करण्यात आली आहे. हत्येच्या गुन्ह्यात फैजल  यांना दोषी ठरवण्यात आले होते. त्यामुळे त्यांची खासदारकी 11 जानेवारी रोजी काढून घेण्यात आली होती.

राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून आलेले मोहम्मद फैजल (NCP MP Mohammed Faizal) यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. मात्र, त्यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) होणाऱ्या सुनावणीपूर्वीच लोकसभा सचिवालयाने त्यांच्या अपात्रतेचा आदेश मागे घेतला. त्यामुळे फैजल यांना पुन्हा खासदारकी बहाल करण्यात आली आहे.

हत्येचा प्रयत्न (Attempted Murder) केल्या प्रकरणी फैजल यांना दहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात
आली होती. त्यानंतर फैजल यांना अपात्र ठरवण्यात आले. मात्र केरळ उच्च न्यायालयाने (Kerala High Court)
25 जानेवारी रोजी त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली.

लोकसभा सचिवालयाने 13 जानेवारी रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, कावरट्टी येथील सत्र न्यायालयाने
(Kavaratti Sessions Court) हत्येचा प्रयत्नाच्या खटल्यात दोषी ठरवल्याच्या तारखेपासून
(11 जानेवारी 2023) फैजल यांना लोकसभेच्या सदस्यत्वापासून अपात्र ठरविण्यात आले होते.

Web Title :-  NCP MP Mohammed Faizal | ncp lakshadweep leader mohammed faizal lok sabha membership restored ahead of supreme court hearing

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Minister Sanjay Rathod |औषध, वैद्यकीय उपकरणे खरेदी प्रक्रियेसाठी बृहत आराखडा निश्चित करावा – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

Beed Accident News | काळाने केला घात! परीक्षेला जाताना वाहनाने दिलेल्या धडकेत बाईकस्वार तरुणाचा मृत्यू

Total
0
Shares
Related Posts
Amravati Assembly Constituency | mla sulbha khodke suspended from congress for six years for doing anti party activities she likely to join ajit pawar ncp

Amravati Assembly Constituency | पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत काँग्रेसमधून सहा वर्षांसाठी निलंबन; आता सुलभा खोडके अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून निवडणूक लढविण्याच्या तयारीत

Sayaji Shinde On Sushma Andhare | sushma andhare criticism on ncp ajit pawar entry and now the sayaji shinde counterattack

Sayaji Shinde On Sushma Andhare | ‘सयाजी शिंदेंनी गुलीगत धोका दिला’, राष्ट्रवादीच्या प्रवेशावर सुषमा अंधारेंचा निशाणा; शिंदेंचा पलटवार; म्हणाले – ‘मी सुषमा अंधारे यांना विचारून निर्णय घेत नाही’