NCP MP Supriya Sule | अब्दुल सत्तारांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या- ‘मला आवर्जून सांगायचे आहे की, जर कुणी…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Agriculture Minister Abdul Sattar) यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांच्यावर टीका करताना वादग्रस्त विधान (Controversial Statement) केले आहे. त्याचे राज्यभर तीव्र पडसाद उमटत आहेत. तसेच सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. सत्तार यांच्या वक्तव्याबाबत भाजप (BJP) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी देखील नाराजी व्यक्त केली. तसेच मुख्यमंत्र्यांनी सत्तार यांना माफी मागण्याचे आदेश दिले. या सगळ्या वादावर काल दिवसभर शांत असलेल्या सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर अब्दुल सत्तार यांनी जाहीर माफी मागितली. तरीही राष्ट्रवादी सत्तार यांच्या राजीनाम्यावर ठाम आहेत. या सगळ्या वादावर शांत असलेल्या सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांनी ट्विट करुन प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

महाराष्ट्राच्या एका मंत्र्याकडून काही अपशब्द वापरले गेले,याची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात उमटली. कारण अशा प्रकारची वक्तव्ये ही महाराष्ट्राची संस्कृती (Culture of Maharashtra) नाही. असं बोलणं-वागणं ही आपली परंपरा नाही. अशा प्रकारची वक्तव्ये सत्तेच्या केंद्रस्थानी बसलेल्या लोकांकडून अपेक्षित नसतात, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

परंतु सगळेच तारतम्य पाळतात असे नाही. जरी त्यांनी काही तारतम्य पाळले नाही तरी ज्या पद्धतीने विविध संस्था,
व्यक्ती, माध्यमातून याबाबत प्रतिक्रिया आल्या, संवेदना व्यक्त केल्या गेल्या ही बाब आश्वासक आहे.
तिची नोंद घेणे गरजेचे आहे. मला आवर्जून असे सांगायचे आहे की, जर कुणी चुकीचे बोलले असेल,
त्यांनी महिलांचा सन्मान जपला नसेल म्हणून आपण अस्वस्थ होणं स्वाभाविक असलं तरी आपण या सगळ्या
प्रवृत्ती बाजूला टाकूयात आणि महाराष्ट्राची जी सुसंस्कृती परंपरा आहे, ती जतन करुया,
असं आवाहन सुप्रिया सुळे यांनी केले.

याप्रसंगी राज्यातील विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी, जाणकारांनी समंजसपणाची भूमिका दाखवून महाराष्ट्र हा
‘सुसंस्कृतच महाराष्ट्र’ आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित केले याबद्दल मी मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करते,
असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Web Title :-  NCP MP Supriya Sule | supriya sule first reaction on abdul sattar controversial statement

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Har Har Mahadev | ‘हर हर महादेव’ चित्रपटावरुन राजकारण पेटलं !, ‘आज मनसेचा शो आहे, हिंमत करु नका!’, मनसेच जितेंद्र आव्हाडांना ओपन चॅलेंज