NCP Rohit Pawar | उद्या ED कार्यालयात माझ्यासोबत शरद पवार, सुप्रिया सुळे येणार, रोहित पवारांची माहिती, कार्यकर्त्यांना म्हणाले…

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – NCP Rohit Pawar | महाराष्ट्र शिखर बँकेशी निगडीत कथित घोटाळ्याप्रकरणी (Maharashtra Shikhar Bank Scam Case) अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी – ED) राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (NCP Rohit Pawar) यांना नोटीस बजावली आहे. उद्या २४ जानेवारीला ईडी कार्यालयात रोहित पवारांना उपस्थित राहण्यास सांगितले आहे. यावेळी माझ्यासोबत ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) येणार आहेत, अशी माहिती स्वत: रोहित पवार यांनी एक्सवर दिली आहे.

रोहित पवार यांनी या संदर्भात एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ईडी कार्यालयात उद्या (बुधवार दि. २४ जानेवारी) चौकशीसाठी गेल्यानंतर यापूर्वी जसं सहकार्य केलं तसंच आताही अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करणार आहे. मात्र सध्याचं सुडाचं राजकारण बघता सर्वच यंत्रणांवर सरकारचा प्रचंड दबाव असल्याने याच दबावाखाली माझ्याबाबत ईडीने काही चुकीची कारवाई केली तर कुणीही घाबरून जाऊ नये.

कार्यकर्त्यांना उद्देशून रोहित पवार यांनी या पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे की, उलट आदरणीय पवार साहेबांसोबत
आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान जपणाऱ्या व संविधानावर विश्वास असलेल्या प्रत्येक व्यक्तीसोबत सर्वांनी एकजुटीने उभं
रहावं. कारण आपल्याला कुणापुढंही न झुकता महाराष्ट्राचा स्वाभिमानी बाणा टिकवायचाय आणि महाराष्ट्र धर्म जपायचाय!

रोहित पवार यांनी म्हटले आहे की, माझ्या कुटुंबासाठी आणि कोवळ्या वयातील मुलांसाठी तर हे घाणेरडं राजकारण
न समजण्याच्या पलीकडचं आहे. पण तरीही सर्वजण खंबीरपणे माझ्यासोबत आहेत.

शिवाय उद्या खा. सुप्रियाताई आणि स्वतः आदरणीय पवार साहेबही येत आहेत. वय झालं म्हणून काय झालं? वय
झालेली माणसं तरुणांना संधीही देतात आणि प्रसंगी बाप माणूस म्हणून ढाल बनून उभीही राहतात.
माझ्यासाठी तर हे भारावणारं आहे. या वयातही महाराष्ट्राचा हा सह्याद्री कणखरपणे पाठीशी उभा राहत असेल तर
आणखी काय हवंय!, असे रोहित पवार यांनी शेवटी म्हटले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पुणे : क्रिकेट खेळण्यावरुन तरुणांमध्ये राडा, दोघांना बेदम मारहाण; 8 जणांवर FIR

Pune ACB Trap News | पुणे: 5 लाखाच्या लाच प्रकरणात वकिल झाला मध्यस्थ; लाच घेताना वकिलासह पोलिस उपनिरीक्षकास अ‍ॅन्टी करप्शनकडून अटक

चिंचवडमध्ये लागलेल्या आगीत दोन सख्ख्या भावांचा होरपळून मृत्यू (Video)

पुण्यात पादचाऱ्यांचे मोबाईल चोरले, तर सिंहगड रोड परिसरात फोटोग्राफरचा कॅमेरा पळवला

Pune Police MPDA Action | आंबेगाव परिसरातील अट्टल गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई! पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 92 वी स्थानबध्दतेची कारवाई

मुंढवा पोलिसांच्या तत्परतेमुळे कर्नाटकमधील पीडित मुलगी कुटुंबियांच्या ताब्यात