Neelam Gorhe | सुषमा अंधारेंनी आठ दिवसांत दिलगिरी पत्र द्यावे, अन्यथा हक्कभंग प्रस्ताव, नीलम गोऱ्हेंचा इशारा

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभेचे आमदार रवींद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar) यांना सभागृहात बोलण्याची संधी नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) देत नसल्याचा आरोप शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी माध्यमांसमोर केला होता. या आरोपाची दखल सभागृहाने घेतली होती. आता या प्रकरणी हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्याची मागणी भाजपा आमदार प्रविण दरेकर (BJP MLA Pravin Darekar) यांनी केली आहे. अंधारे यांनी येत्या आठ दिवसात दिलगिरी पत्र दिले नाही तर त्यांच्यावर हक्कभंग दाखल करण्यास परवानगी देऊ असे विधान परिषदेच्या सभापती निलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी म्हटले आहे.

काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर हे विधानसभेचे सदस्य आहेत, तर निलम गोऱ्हे या विधान परिषदेच्या सभापती आहेत. त्यामुळे आमदार धंगेकरांना निलम गोऱ्हे बोलण्याची संधी देत नाहीत, हा सुषमा अंधारे यांचा आरोप वादग्रस्त ठरला आहे.

यावरून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा (Maharashtra Winter Session 2023) आजच्या शेवटच्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी झाली. रवींद्र धंगेकर हे विधानसभेचे सदस्य असताना त्यांना नीलम गोऱ्हे बोलण्याची कशी काय परवानगी देऊ शकतात? असा सवाल प्रवीण दरेकर आणि सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी केला. याप्रकरणी उपसभापतींची बदनामी केल्याप्रकरणी सुषमा अंधारेंवर हक्कभंग दाखल करण्याची मागणी प्रवीण दरेकर यांनी केली.

यावर नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) म्हणाल्या, रवींद्र धंगेकरांना बोलण्यास नीलम गोऱ्हे संधी देत नाहीत, असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला होता. मला वाटले की रवींद्र धंगेकर यांना सुषमा अंधारेंच्या चुकीच्या वक्तव्याची जाणीव होईल आणि ते त्यांना समजावतील. त्यामुळे मी पाच ते सहा दिवस त्यांची वाट पाहिली.

उद्धव ठाकरे सभागृहात येत असतात. आपले प्रवक्ते इतकं चुकीचे
बोलले आहेत यावरून ते समज देतील असे वाटले. पण त्यांना त्यांच्या
चुकीच्या वक्तव्याची जाणीव कोणीच करून दिली नाही.
त्या ज्ञानी आहेत. त्या स्वतःला ज्ञानी समजतात. त्यांना सर्व समाज सर्टिफिकेट देतो की त्या ज्ञानी आहेत.
मग त्यांना दिलगिरी व्यक्त करण्याचे सौजन्य असू नये?

नीलम गोऱ्हे म्हणाल्या, एकच खोटं तीन तीन वेळा सांगितले की ते खरे वाटायला लागते.
सुषमा अंधारेंची ही चूक असल्याचे सचिन अहिरांनी मान्य केले आहे.
पण सुषमा अंधारेंनी आता तसे लेखी पत्र दिले पाहिजे.
अज्ञानातून किंवा गैरसमाजतून त्यांनी तसे वक्तव्य केले
असे त्यांनी मान्य केले पाहिजे. आठ दिवसांत त्यांच्याकडून
तसे पत्र आले नाही तर प्रवीण दरेकरांना त्यांच्यावर हक्काभंगाचा
प्रस्ताव दाखल करण्याची परवानगी देणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Lok Sabha Elections 2024 | पुण्यातील भाजपा आमदारांचे रिपोर्ट कार्ड मागवले, दुसरीकडे वाटेकरी वाढले, धडधड वाढली