अभिनेत्री नीना गुप्तांच्या सिनेमाला ‘ऑस्कर’ नामांकन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ऑस्कर पुरस्कारातील यादीत नामांकन मिळणे ही सिनेमा क्षेत्रात फार मोठी उपलब्धी समजली जाते. अशी उपलब्धी सेलिब्रिटी शेफ ते फिल्ममेकर असा प्रवास करणाऱ्या विकास खन्ना यांच्या पहिल्या सिनेमास मिळाली आहे. त्यांचा पहिलाच सिनेमा ‘द लास्ट कलर’ला ऑस्कर पुरस्कारातील फीचर फिल्मच्या यादीत नामांकन मिळालं आहे. पहिल्याच सिनेमाला ऑस्करमध्ये नामांकन मिळाल्यामुळे सध्या विकास खन्ना फार आनंदी आहेत. स्वतः विकास खन्ना यांनी सोशल मीडियावर याबद्दलची माहिती दिली आहे.

विकासने आपल्या ट्विटरवर लिहिले की, ‘२०२० ची सर्वात चांगली सुरुवात. जादू.. ऑस्कर अकादमीने २०१९ मधील सर्वोत्तम ३४४ सिनेमांची घोषणा केली. यात द लास्ट कलर सिनेमाचा समावेश आहे. साऱ्यांना खूप धन्यवाद.’ त्यांच्या या ट्विटला लास्ट कलर सिनेमातील अभिनेत्री नीना गुप्ता यांनी रीट्वीट केले आणि म्हटले की, ‘माझा विश्वासच बसत नाहीये. मी खूप आनंदी आहे.’ याशिवाय नीना आणि विकास यांनी आपला आनंद व्यक्त करण्यासाठी अजून एक पोस्ट लिहिली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, सिनेमा लॉस एन्जेलिस येथील कमर्शल मोशन पिक्चर थिएटरमध्ये ३१ डिसेंबरच्या आधी प्रदर्शित करावा लागतो. तेव्हाच या यादीत सिनेमाचं नाव येत असतं. हे एवढ्यावरच थांबत नसून त्यासाठी कमीत कमी ७ दिवस तो सिनेमा थिएटरमध्ये यशस्वीरित्या चालावा लागतो. तेव्हा कुठे ही उपलब्धी मिळत असते.

४ जानेवारी २०१९ ला अमेरिकेत ३० व्या पाम स्प्रिंग्स इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये ‘द लास्ट कलर’ हा सिनेमा प्रदर्शित करण्यात आला होता. हा सिनेमा भारतात अजून प्रदर्शित झालेला नाही. मागील वर्षी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये या सिनेमाचं स्क्रीनिंग ठेवण्यात आलं होतं. विशेष म्हणजे या सिनेमात वृंदावन आणि वाराणसीत राहणाऱ्या विधवा स्त्रियांची कहाणी मांडण्यात आली आहे.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !