Neena Gupta | नीना गुप्ताच्या प्रेग्नंसीदरम्यान जेव्हा कुणीही नव्हते सोबत, तेव्हा सतीश कौशिक यांनी दिला होता लग्नाचा प्रस्ताव

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  –  एकेकाळी एंटरटेनमेंट मॅग्झीनच्या सर्वात मोठ्या गॉसिप्समध्ये राहणारी अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) अलिकडे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मोठ्या कालावधीनंतर ’बधाई हो’ चित्रपटातून सिनेमात परतलेली नीना गुप्ता (Neena Gupta) सध्या वैयक्तिक जीवनामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच तिने आपली ऑटोबायोग्राफी(Autobiography) ’सच कहूं तो’ (Sach Kahun Toh) मध्ये आपल्या वैयक्तिक जीवनाबाबत अनेक खुलासे केले आहेत.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

नीनाने या ऑटोबायोग्राफीत (Autobiography) अनेक खुलासे केले आहेत.
जे ऐकल्यानंतर विश्वास ठेवण्यास काही वेळ लागू शकतो.
नीनाची ऑटोबायोग्राफी ’सच कहूं तो (Sach Kahun Toh)’ करीना कपूर खानने व्हर्च्युअली लाँच केली.
या दरम्यान तिने फिल्ममेकर आणि अभिनेता सतीश कौशिक (Satish Kaushik) यांच्याशी संबंधीत एक खास किस्सा शेयर केला आहे.

नीना गुप्ताने सांगितले ’स्वर्ग’ चे सह-अभिनेते सतीश कौशिक यांनी त्यावेळी लग्नाचा प्रस्ताव दिला होता, ज्यावेळी ती प्रेग्नंट होती.
सतीश तिच्या होणार्‍या बाळाला सुद्धा स्वीकरण्यास तयार होते परंतु नीनाने सतीश यांचे प्रपोजल नाकारले.

Karnala Bank Scam | कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणी शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना ED कडून अटक

आपली ऑटोबायोग्राफी ’सच कहूं तो’ मध्ये नीना गुप्ताने खुलासा केला आहे.
की, सतीश कौशिक यांनी नीनाला म्हटले होते की, जर तिचे बाळ डार्क स्किनचे जन्माला आले तर ती सांगू शकते की, हे मुल त्यांचे आहे आणि दोघे लग्न करू.
कुणाला याबाबत समजणार नाही.
मात्र, नीनाने त्यावेळी एकटी राहण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या मुलीचे पालन-पोषण एकटीने केले.

नीना गुप्ताने ’सच कहूं तो’मध्ये कास्टिंग काऊचबाबत सुद्धा लिहिले आहे.
याशिवाय फिल्म इंडस्ट्रीमधील पॉलिटिक्स, प्रेग्नंसी आणि सिंगल पॅरंटहुडबाबत सुद्धा तिने लिहिले आहे.

 

Web Title : neena gupta reveal satish kaushik had offered to marry with her when she was pregnant with masaba gupta

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

शेतकर्‍यांसाठी मोठी खुशखबर ! मोदी सरकार देत आहे 4000 रूपये मिळवण्याची संधी, पहा डिटेल

योगी सरकारचा मोठा निर्णय ! ज्येष्ठाला मारहाण व दाढी कापण्याच्या प्रकरणाला वेगळं वळण; ट्विटरसह 9 जणांवर FIR, धार्मिक भावना भडकावल्याचा आरोप