NEET Students Question-Teacher Answer | मूल कसं जन्माला येतं, प्रॅक्टिकल दाखवा! ऑनलाईन NEET क्लासमध्ये विद्यार्थ्याने विचारला प्रश्न, शिक्षिकेचे रोखठोक उत्तर

मुंबई : NEET Students Question-Teacher Answer | बायलॉजीच्या शिक्षिकेला एनईईटीच्या विद्यार्थ्याने ऑनलाईन क्लासमध्ये अचानक एक अश्लील प्रश्न विचारला. हा प्रश्न होता मॅम, मूल कसे जन्माला येते, प्रॅक्टिकल दाखवा. या प्रश्नावर न गडबडता शिक्षिकेने त्याला असे उत्तर दिले की, त्याने पुन्हा काही विचारण्याची हिंमत केली नाही. (NEET Students Question-Teacher Answer)

नीट-यूजी विद्यार्थ्यांसाठी यूट्यूब चॅनल चालवणाऱ्या रक्षिता सिंह यांच्या ऑनलाईन क्लासमध्ये हा प्रकार घडला आहे. त्या बायोलॉजी शिकवत होत्या. या प्रकारानंतर रक्षिता सिंह यांनी इन्स्टाग्रामवर या घटनेच्या व्हिडिओसह एक पोस्ट केली आहे. हा व्हिडिओ साशेल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यावर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. बहुतेकांनी रक्षिता यांचे कौतुक केले आहे.

ही घटना सांगताना कथन करताना रक्षिता सिंह यांनी म्हटले आहे की, लेक्चर सुरू असताना एका विद्यार्थ्याने मला विचारले. मॅम, मूल कसे होते? प्रॅक्टिकल करुन दाखवा. मी त्याला म्हणाले, आईला करुन दाखवायला सांग. आईने तर केले आहे. मी तर अविवाहित आहे. त्यामुळे मला प्रॅक्टिकल ज्ञान नाही. (NEET Students Question-Teacher Answer)

व्हायरल व्हिडीओत रक्षिता त्या विद्यार्थ्याला म्हणतात, तू लहान आहेस. तुझ्यापेक्षा मी चार-पाच वर्षांनी मोठी आहे.
माझे एमबीबीएस संपणार आहे. तुझी एनईईटी होण्यापूर्वी मी प्रॅक्टिसिंग डॉक्टर होते.
मी अशा प्रकारच्या प्रश्नांना अजिबात भीक घालणार नाही.

रक्षिता यांनी व्हिडिओसोबतच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, मी ४ वर्षांपू्र्वी शिकवण्यास सुरुवात केली.
सुरुवातीच्या दिवसांत एकदा सकाळी ६ वाजता क्लास घेत होते. एका मुलाने क्लास सुरू असताना अश्लील कमेंट केली.
मला त्रास झाला. मी रडायला लागले.

पुढे क्लास घेण्याचे धाडसच झाले नाही. मी क्लास रद्द केला. त्या मुलाला समजावण्याचा प्रयत्न केला.
हा लाईव्ह क्लास असल्याचे सांगितले. पण तो ऐकायला तयार नव्हता. तो अश्लील टिप्पणी करतच होता.

रक्षिता पुढे म्हणतात, मुलांना केवळ शिकवणे हीच माझी जबाबदारी नाही, तर त्यांना एक माणूस म्हणून घडवणे देखील
माझी जबाबदारी असल्याचे मला वाटते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Tamannaah Bhatia Killer Photo | तमन्ना भाटीयानं ब्लॅक बॉडीकॉन ड्रेसमध्ये इंटरनेटचा वाढवला पारा, पाहा व्हायरल फोटो

Namrata Malla Bralette Photo | भोजपुरी अभिनेत्री नम्रता मल्लाचे हॉट लूक पाहून तुम्हीही व्हाल घायाळ..