NEET परीक्षेचा निकाल जाहीर ; ‘या’ एकाच राज्यातील ७ विध्यार्थी टॉप लिस्टमध्ये !

नवी दिल्ली: वृत्तसंस्था – देशातील नामांकित वैद्यकीय  महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी घेण्यात आलेल्या  NEET परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून राजस्थानातील नलीन खंडेलवाल या विध्यार्थ्याने प्रथम क्रमांक मिळवला आहे. तसेच या एकाच राज्यातील ७ विदयार्थी  टॉपच्या ५० विद्यार्थ्यांच्या यादीत आहेत.

नलीनला ७२० पैकी ७०१ गुण मिळाले आहेत. तसेच दुसऱ्या क्रमांकावर दिल्लीचा भाविक बन्सल असून त्याने ७२० पैकी ७०० गुण मिळवले आहेत.आणि तिसऱ्या क्रमांकावर उत्तरप्रदेशचा अक्षत कोशिक आहे. त्यानेही ७२० पैकी ७००गुण मिळवले आहेत.

मुलींमध्ये तेलंगणाची माधुरी रेड्डी या विध्यार्थीनीने प्रथम क्रमांक मिळवला असून तिने ७२० पैकी ६९५ गुण मिळवले आहेत. २० मे ला ही परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षी जवळपास १५.१९ लाख विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी अर्ज केले होते. त्यातील १४.१० लाख विद्यार्थी परीक्षेस बसले होते.

Loading...
You might also like