आंदोलनातील तोडफोडीमुळे नकारात्मकता निर्माण होतेय

औरंगाबाद/ पुणेः पोलीसनामा आॅनलाईन
मराठा आरक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंद आंदोलनाला पुणे आणि आैरंगाबाद शहराता हिंसक वळण लागले. यावेळी आंदोलकांनी बेकाबू होत सार्वजनिक मालमत्तेसह खाजगी कंपन्यांची देखील तोडफोड केली. यासंपूर्ण घडामोडीचा परिणाम आता व्यावसायिक क्षेत्रावर देखील होवू लागला आहे. आंदोलनातील तोडफोडीमुळे नकारात्मकता निर्माण होत असून, यापुढे आम्ही शहरात व्यावसायिक गुंतवणूक करायची की नाही असा सवाल आत उद्योगपती विचारु लागले आहेत.
राज्यामध्ये जर सतत अशा घटना होत राहिल्या तर त्याचा गंभीर परिणाम येथील व्यावसाय विश्वावर होवू शकतो. एवढेच नाही तर बाहेरच्या देशातून किंवा राज्यातून होणारी परकिय गुंतवणूक कमी होवू शकते. काल ( गुरूवार) आंदोलना दरम्यान आैरंगाबाद येथील वाळूज एमआयडीसीत हिंसक वळण लागले. यावेळी आंदोलकांनी तब्बल 50 कंपन्यांची विनाकारण तोडफोड केली. तसेच पोलीस व्हॅन, अग्निशामक दलाची गाडी आणि ट्रक पेटवून दिला.
 [amazon_link asins=’B07F8Y8DL4′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’06582209-9c86-11e8-8049-dfe2af31ec4f’]
जो उद्योग आपल्याला रोजीरोटी देतो, त्याच ठिकाणी आंदोलकांनी धुडगूस घातला. आैरंगाबादमधील उद्योगांना असेच लक्ष्य केले तर इथे उद्योगधंदे आणायचे का नाही असा प्रश्न पडला असल्याची चिंता आैद्योगिक वसाहतीच्या संघटनेनी व्यक्त केली. वारंवार आंदोलकांकडून करण्यात येत असलेल्या आंदोलनामुळे आमचे किती नुकसान झाले यापेक्षा आमचे मानसिक खच्चीकरण किती झाले हे पाहणे गरजेचे आहे. सतत होणाऱ्या अशा घटनामुळे शहराच्या अाैद्योगिक विकासावर त्याचा परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही असे देखील त्यांनी म्हटलं आहे.
औरंगाबाद हे प्रगतशील ऑटोहब म्हणून ओळखले जाते. वाळूज ही मोठी औद्योगिक वसाहत आहे. आंदोलनामुळे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.  या पार्श्वभूमीवर औरंगाबाद औद्योगिक संघटनेने रात्री उशिरा पत्रकार परिषदेचे आयोजन करुन या प्रकाराचा निषेध व्यक्त केला. आरक्षणासाठी हे आंदोलन सुरू आहे. मात्र रोजगार हा सरकारपेक्षा उद्योगामध्ये जास्त मिळणार आहे. तसेच आम्ही नोकऱ्या देताना जात-पात न पाहता देतो. त्यामध्ये स्थानिक आणि सक्षम उमेदवारांना अगोदर प्राधान्य देतो. आंदोलनात सुमारे ५० ते ६० मोठ्या कंपन्यांवर तर १० छोट्या कंपन्यांवर हल्ला करण्यात आला. सर्वात गंभीर म्हणजे शस्त्राचा धाक दाखवून हा हल्ला करण्यात आला. यामुळे आमच्या कंपनीत काम करणाऱ्यांच्या मनोधैर्याचे खच्चीकरण झाले असल्याचे मत व्यावसायिकांनी व्यक्त केले आहे.
[amazon_link asins=’B01NAUKS62′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4eeac6ed-9c86-11e8-8a2e-6fe30c966fac’]
तर ईकडे पुण्यात देखील आंदोलना दरम्यान काही आंदोलकांनी कंपनीमध्ये घुसून तोडफोड केली. त्यामुळे शहरातील आैद्योगिक वसाहतीमध्ये देखील घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. एकंदर दोन्ही शहरातील अाैद्योगिक वसाहतीमध्ये केलेल्या तोडफोडीचा परिणाम उद्योगावर होण्याची शक्याता आहे.