NetFlix युजर्ससाठी खुशखबर ! येताहेत 41 नवे प्रोजेक्ट्स

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसच्या महामारीमुळे थिएटर्स बंद असल्याने आता अनेकजण OTT प्लॅटफॉर्म NetFlix चा वापर मोठ्या प्रमाणात करत आहेत. आता याच OTT प्लॅटफॉर्म NetFlix ने 2021 या वर्षासाठी 41 नव्या टायटल्सची घोषणा केली आहे. यामध्ये 13 फिल्म आणि 15 वेब सीरिज आणि 4 डॉक्युमेंटरी, 6 स्टँड-अप कॉमेडी स्पेशल आणि तीन रिॲलिटी शोचा समावेश आहे. हे इंडियन प्रीडेटर सीरीजही NetFlix वर रिलीज होणार आहे.

बॉलिवूड सेलिब्रिटी सोनाक्षी सिन्हा, तापसी पन्नू, जितेंद्र कुमार, अर्जुन रामपाल, कार्तिक आर्यन, धनुष, सान्या मल्होत्रा, नीना गुप्ता, अर्जुन कपूर, कपिल शर्मा, मनोज वाजपेयी, माधुरी दीक्षित, नुसरत भरुचा, कोंकणा सेन शर्मा, आदिती राव हैदरी, शेफाली, शॉह, बॉबी देओल, अर्जुन रामपाल यांसारखे सेलिब्रिटी वेग-वेगळ्या वेब सीरिजमध्ये दिसणार आहेत.

नेटफ्लिक्सवर येणाऱ्या 13 फिल्म
– अजीब दास्तांस – करण जोहर, दिग्दर्शक नीरज घेवान
– बुलबुल तरंग – सोनाक्षी सिन्हा
– धमाका – कार्तिक आर्यन
– द डिसिपल – चैतन्य तम्हाने
– हसीन दिलरुबा – तापसी पन्नू
– जादूगर – जितेंद्र कुमार
– जगमे थंदीराम – धनुष
– मीनाक्षी सुंदरेश्वर – सान्या मल्होत्रा
– माइलस्टोन – इवान अय्यर
– नवरस – मणि रत्नम
– पगलेट – सान्या मल्होत्रा
– पेंटहाउस – अब्बास मस्तान
– सरदार का ग्रँडसन – नीना गुप्ता, अर्जुन कपूर

15 नवे वेब सीरीज
– अरण्यक – रविना टंडन
– बॉम्बे बेगम्स – अलंकृता श्रीवास्तव
– डिकपल्ड – माधवन
– दिल्ली क्राइम सीजन 2 – एक अंतरराष्ट्री. एम्मी विजेता
– फील्स लाइक इश्क – राधिका मदान, तान्या मणिकटकला, जैन मेरी खान, नीरज माधव यांसह अनेक वेब सीरीज येणार आहेत.

3 रिऍलिटी शो
– द बिग डे : क्लेक्शन 2 – कोन्डे नास्ट इंडिया
– फॅबुलस लाइव्स ऑफ बॉलीवूड वाइव्स सीजन 2 – करण जोहर
– सोशल करन्सी – फजिला अलाना, कामना मेनेज