Netflix च्या रु.199 आणि रु.499 रुपयांच्या प्लानमध्ये मोठे बदल,जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नेटफ्लिक्स काहीकाळ भारतात नव्या प्लॅनची टेस्टिंग करत आहे. भारतासाठी सर्वात स्वस्त प्लॅन लाँच करण्यात आले आहेत. काही काळादिवसांपूर्वी ‘मोबाईल ओन्ली प्लॅन’ लाँच करण्यात आले होते.

कंपनीने भारतात दोन बेसिक प्लॅनमध्ये काही बदल केले आहेत. हे प्लॅन रु.199 रुपये आणि रु.499 रुपयांचे आहेत. रु.199 रुपयांचा प्लॅन केवळ मोबाइलसाठी आहे. हे दोन्ही प्लॅन एसडी आहेत. परंतु आता हे प्लॅन अपग्रेड करून एचडी करण्यात आले आहेत.

आता या दोन्ही प्लॅनअंतर्गत तुम्ही 720पी मध्ये नेटफ्लिक्सचे कन्टेन्ट पाहू शकता. यामध्ये केवळ 480पी क्वालिटी व्हिडिओ पाहू शकता.

या दोन्ही प्लॅनशिवाय अन्य सर्व प्लॅन पहिल्याप्रमाणेच काम करतील. सध्या या दोन्ही प्लॅनला अपग्रेड करून कंपनी ते टेस्ट करत आहे. ते फायनल लाँच करण्यात येतील किंवा नाही याबाबत स्पष्टता नाही.

आतासाठी केवळ ऐवढेच आहे की, जर तुमच्याजवळ नेटफ्लिक्सचे रु.199 रुपये किंवा रु.499 रुपयांचे सबस्क्रिपशन आहे तर तुम्ही एचडी क्वालिटीमध्ये नेटफ्लिक्सचे कंन्टेन्ट पाहू शकता.

नेटफ्लिक्सच्या दुसर्‍या प्लॅनबाबत बोलायचे तर फुल एचडीसाठी रु.649 रुपयांचा प्लॅन आहे, तर रु.799 रुपयांच्या मंथली प्लॅनमध्ये 4 के + क्वालिटी मिळते.

नेटफ्लिक्स इंडियाने एका स्टेटमेन्टमध्ये म्हटले आहे की, आम्ही नेहमी नेटफ्लिक्स एक्सपिरियन्सला आणखी चांगले आणि इमर्सिव्ह करण्याच्या पद्धतीवर काम करत असतो. सध्या ही एक टेस्ट आहे आणि हे सर्वांसाठी लाँच केले जाईलच असे नाही.