‘लक्ष्मी’वर संतापले नेटकरी, म्हणाले – ‘सिनेमावर पैसे खर्च करण्यापेक्षा गरीबांना दान करा’

पोलीसनामा ऑनलाईन : सिनेमाच्या टायटलवरून सुरुवातीपासून वादात सापडलेला बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार (akshay-kumar) आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) यांचा ‘लक्ष्मी’ (lakshmi) हा सिनेमा सोमवारी (दि. 9) डिजिटली रिलीज होत आहे. मात्र रिलीजच्या ऐन तोंडावर या सिनेमाला होत असलेला विरोध आणखी तीव्र होत आहे. या सिनेमाबद्दलचा राग, संताप अनेकांनी सोशल मीडियावर( bollywood-netizens-are-again-angry-akshay-kumar-film-lakshmi) व्यक्त केला आहे.

 

अक्षय व कियाराच्या या सिनेमाचे नाव आधी ‘लक्ष्मी बॉम्ब’ असे ठेवले होते. मात्र अनेकांनी या टायटलवर आक्षेप नोंदवल्यानंतर ते बदलून ‘लक्ष्मी’ असे नामकरण करण्यात आले. तरीही लोकांचे समाधान झालेले नाही. लक्ष्मी हे देवतेचे नाव आहे. त्यामुळे या नावाने सिनेमा रिलीज करणे योग्य नाही, अशी भूमिका घेत लोकांनी या चित्रपटावर बहिष्कार घालण्याची मागणी केली आहे. या चित्रपटावर पैसै फुकट घालवू नका. त्यापेक्षा हा पैसा गरिब, गरजूंना दान करा, अशा आशयाचे अनेक ट्विट नेटक-यांनी केले आहेत. बनावटी लोकांना सिनेमा पाहायचा नाही, असे म्हणत एका युजरने या सिनेमाला विरोध केला आहे. केवळ ‘बॉम्ब’ हटवले, मात्र ‘लक्ष्मी’ तसेच कायम ठेवले. सिनेमाच्या टायटलचा चित्रपटाच्या कथानकाशी काहीही संबंध नसताना हे नाव दिले गेले, हा हिंदूंच्या भावना दुखावण्याचा प्रकार असल्याचे एका नेटक-यांनी म्हटले आहे. आम्हाला ना ‘लक्ष्मी बॉम्ब’ नाव हवे, ना ‘लक्ष्मी’ अशी मागणी नेटक-यांनी केली आहे.

लव्ह जिहादला प्रोत्साहन देत असल्याचाही आरोप
‘लक्ष्मी’ या सिनेमावरही लव्ह जिहादला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप करत आहेत. सिनेमात अक्षय कुमारच्या भूमिकेचे नाव आसिफ आहे. तर कियारा अडवाणीच्या भूमिकेचे नाव प्रिया आहे. लक्ष्मी’हा तमिळ सिनेमा ‘कंचना’चा हिंदी रिमेक आहे. ओरिजीनल सिनेमात हिरोच्या भूमिकेचे नाव राघव होते. मग याच्या हिंदी रिमेकमध्ये हे नाव आसिफ कसे झाले. आणि हिरोईनच्या भूमिकेचे नाव प्रिया का ठेवले गेले असा सवाल अनेकांनी उपस्थित केला होता. अक्षयसोबतच या सिनेमात मुख्य भूमिकेत कियारा अडवाणी दिसणार आहे.