सावधान ! चुकूनसुध्दा ‘या’ 7 गोष्टी Google वर सर्च करू नका, अन्यथा हाऊ शकते फसवणूक, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आपण अनेकदा रोजच्या जीवनात गुगलचा मोठ्या प्रमाणावर वापर करतो. एखादी माहिती सर्च करण्यासाठी किंवा नवीन ठिकाणे शोधण्यासाठी अशी कोणत्याही प्रकारची माहिती हवी असेल तर आपण लगेच गुगलचा वापर करतो. परंतु जर तुम्हाला नेहमीच गुगलची मदत घेण्याची सवय असेल तर कृपया सावधान ! कारण अशा काही गोष्टी आहेत ज्या गुगलवर शोधल्या नाही पाहिजेत.

या गोष्टी गुगलवर कधीही शोधू नका –

1. आपल्या बँकेची वेबसाईट कधीच गुगलवरून सर्च करू नका. अशा महत्वाच्या वेबसाईटचा ऍड्रेस लक्षात ठेऊन थेट तिचे युआरएल टाकून ओपन करा. कारण गुगलवर जर त्याला मिळती जुळती वेब साईट उघडली आणि तुम्ही त्यावर माहिती टाकली तर तुम्हाला मोठे नुकसान सहन करावे लागू शकते.

2. एखाद्या कंपनीचे कस्टमर केअरचे संपर्क क्रमांक सुद्धा तुम्ही शोधू नका. कारण अनेक खोट्या वेबसाईट बनवून त्यावर खोटे नंबर टाकले जातात. अशा वेळेस तुमची मोठी फसवणूक होऊ शकते.

3. कोणत्याही सॉफ्टवेअर आणि ऍप साठी गुगल वर सर्च करून डाउनलोड करू नका त्यासाठी नेहमी गुगल प्लेचाच वापर करा.

4. तुम्ही आजारी असाल आणि एखाद्या आजाराबाबत जर गुगलवरून माहिती घेत असाल तर असे करू नका. अशा वेळेस फक्त आणि फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपचार घेण्याचा प्रयत्न करा.

5. जर तुम्ही एखादी सरकारी योजना किंवा सरकारी वेबसाईट शोधात असाल तर तुमची फसवणूक होण्याची जास्त शक्यता आहे. कारण अनेक लोक सरकारी वेबसाईटशी मिळती जुळती साईट बनवून ठेवतात आणि तुमच्या माहितीचा चुकीचा वापर करतात.

6. ई कॉमर्स वेबसाइटच्या ऑफर्स आणि कुपन कोड यांचे सुद्धा गुगलवर सर्चिंग करू नका कारण अनेक जण याद्वारे फसवणूक करण्याच्या तयारीत असतात.

7. यासोबतच फ्री अँटी व्हायरस ऍप आणि सॉफ्टवेअर सुद्धा गुगलवर शोधण्याचे टाळा.

Visit : policenama.com