दीपिकासाठी त्याने घेतलं नवीन घर!

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

बॉलिवूडमधील सर्वात हॉट कपल सतत वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत राहतं. असचं एक नावाजलेलं कपल म्हणजे अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह.या दोघांच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा आहे. यावर्षाच्या शेवटी दोघंही लग्न करणार असल्याचं बोललं जातं आहे. दरम्यान रणवीरने दीपिकासाठी नवीन घर घेतल्याची माहिती मिळाली आहे.

माहितीनुसार, रणवीर आणि दीपिका, विराट कोहली आणि अनुष्का शर्मा वरळीच्‍या एका बिल्डिंगमध्‍ये घर शोधत होते. परंतु, रणवीरने बांद्राच्‍या श्री अपार्टमेंट्समध्‍ये नवं घर घेतलं आहे. याच कॉम्प्लेक्समध्‍ये ६, ७ आणि ८ व्‍या मजल्‍यावर रणवीरचे आई-वडिल आणि बहिण राहते. आता रणवीरने चौथ्‍या मजल्‍यावर नवे घर घेतलं आहे.

रणवीर आणि दीपिका दोघांनाही अत्यंत खासगी पद्धतीने लग्न करायचं आहे.लग्नात भरमसाठ पाहुणे नको आहेत. साधेपणाने आणि सुंदर पद्धतीने लग्न करण्याची इच्छा असणारे दीपिरा-रणवीर मीडियालाही लग्नापासून लांब ठेवणार आहेत. कुटुंबीय व जवळच्या मित्रमंडळीच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडणार आहे. तसंच परदेशात लग्न केल्यानंतर भारतात दोन रिसेप्शन सोहळे पार पडतील, अशी माहिती जवळच्या सुत्रांळून मिळालीआहे.