कॅन्सर रुग्णांना नवसंजीवनी; कोल्हापुरच्या डॉ.अश्विनी साळुंखे यांचे स्पेन विद्यापीठात संशोधन

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – कोल्हापुरा येथील डॉक्टर अश्विनी भगवानराव साळुंखे यांनी स्पेनमधील युनिव्हर्सिटी ऑफ सान्तियागो द कंपोस्टेला या संस्थेतून त्यांनी संशोधन केले आहे. आणि हे संशोधन रुग्णांना उपयोगी पडणार आहे. मॅग्नेटिक नॅनोपार्टिकल्स फॉर हायपर थर्मिया थेरपीचा वापर करून शरीरातील कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्याची ही पद्धत कॅन्सर रुग्णांसाठी एक नवसंजीवनी देणारी ठरणार आहे. कर्करोगावर उपचार करण्यासाठी सध्या किमोथेरपी, रेडिओथेरपी आणि सर्जरी अशा प्रचलित पद्धती आहेत. परंतु यातून रुग्णांना अनेक साइड इफेक्ट सहन करावे लागतात. त्यामुळे रुग्णांना अनेक त्रासाला सामोरे जावे लागते. हे नाहीसे करण्यासाठी कर्करोगावरील उपचारांसाठी नव्या पद्धतीवर डॉ. अश्विनी साळुंखे यांनी यावर संशोधन केले आहे. या उपचार पद्धतीत मॅग्नेटिक नॅनो पार्टिकलसचा वापर करून ड्रग्स फॉर्मुलेशन तयार केले आहे.

डॉक्टर अश्विनी साळुंखे ह्या मूळच्या इस्लामपूरच्या आहेत. त्यांनी जवाहर नवोदय विद्यालय पलूस येथून प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केले आहे. इस्लामपूर मधील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातून भौतिकशास्त्र पदवीचे शिक्षण घेतले. शिवाजी विद्यापीठातून MSCचे शिक्षण घेतल्यानंतर डॉक्टर डी वाय पाटील अभिमत विद्यापीठातुन डॉक्टर एस एच पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मॅग्नेटिक नॅनोपार्टिकलस फॉर हाइपर्मिया थेरपी या विषयात त्यांनी संशोधन केले. त्यानंतर त्यांना स्पेनमधील विद्यापीठात जिटिंग सायंटिस्ट म्हणून त्यांनी कर्करोगावरील उपचार पद्धतीबाबत सलग तीन वर्षे संशोधन केले

हे संशोधन सध्या अंतिम टप्प्यात असून प्राण्यावरील प्रयोग यशस्वी झाला आहे या संशोधनानंतर त्यांना भारत सरकारचा सायन्स अँड टेक्नॉलॉजी विभागाकडून सन्मान करण्यात आला आहे. त्यांच्या संशोधनाचे सादरीकरण नेदरलँडमध्ये करण्यासाठी ट्रॅव्हल सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच त्यांना पुणे विद्यापीठात संशोधन करण्यासाठी यूजीसी कडून डी एस कोठारी पोस्ट डॉक्टरल फिलोशिपही मिळाली आहे. आतापर्यंत त्यांचे तीस आंतरराष्ट्रीय शोधनिबंध सिद्ध झाले आहेत तसेच डॉक्टर अश्विनी साळुंखे संशोधनानंतर भारतात परतल्यावर त्यांनी एमपीएससीची परीक्षा दिली या परीक्षेत यश मिळत यांनी मुंबईतील एल्फिन्स्टन महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली सध्या त्या कोल्हापुरातील राजाराम महाविद्यालयात कार्यरत आहेत.