नाशिकः : वरिष्ठ पोलिस निरीक्षकाचा बारचालकाला दणका, केली ‘ही’ कारवाई

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असतानाच कोरोना संबधित नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी येथील एका रेस्टारंट आणि बार चालकाला 5 हजाराचा दंड ठोठावला आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे पंचवटीतील व्यावसायिक व दुकानदारांचे धाबे दणाणले आहे.

मालेगाव स्टॅन्ड येथील न्यू पंजाब रेस्टॉरंट ॲन्ड बारमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नाही, तसेच अनेकजण विनामास्क वावरत असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक भगत, निरीक्षक (गुन्हे) अशोक साखरे व त्यांच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी रविवारी (दि. 14) रात्री बारवर छापा टाकून बारमालकावर दंडात्मक कारवाई करत नियम पाळण्याच्या सूचना केल्या. पोलिसांनी बारचालकाला 5 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. कारवाईत नाईक रवी आढाव, शिपाई राजू राठोड, यतीन पवार, विजय जारवाल आदी कर्मचारी सहभागी झाले होते.