नवीन कार खरेदीवर मोदी सरकारकडून ‘रजिस्ट्रेशन’ आणि ‘टॅक्स’मध्ये ‘सूट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वाहन उद्योगात असलेल्या मंदीमुळे थोडासा दिलासा देण्यासाठी सरकार नवनवीन पावले उचलत असून मागणी वाढवण्यासाठी देखील सरकार प्रयत्न करत आहे. याचदरम्यान स्क्रॅप पॉलिसीवर देखील सरकारच्या निर्णयाची वाट पाहिली जात होती. यानंतर आता या पॉलिसीच्या ड्राफ्टला कॅबिनेटसमोर ठेवण्यात आले असून लवकरच कॅबिनेटची देखील त्याला मंजुरी मिळणार आहे.
अर्थ मंत्रालय, परिवहन मंत्रालय, स्टील आणि पर्यावरण मंत्रालयांमध्ये संमती झाली असून कॅबिनेटची मंजुरी येताच याची त्वरित अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

जुन्या व्यावसायिक वाहनांवर सक्ती
या नवीन कायद्यामुळे जुनी गाडी दिल्यास नवीन गाडीवर सूट देखील मिळणार आहे. त्याचबरोबर रोड टॅक्स आणि रजिस्ट्रेशन चार्जमध्ये देखील सूट देण्याचे प्रावधान करण्यात आले आहे. तसेच 15 वर्षांपेक्षा जास्त जुन्या वाहनांवर मोठ्या प्रमाणात रोड टॅक्स घेतला जाणार आहे. यामध्ये वाहनाच्या 25 टक्के रक्कम रजिस्ट्रेशन चार्ज म्हणून घेतले जाणार आहे.

ऑगस्ट महिन्यात वाहन विक्रीमध्ये घसरण
मिळालेल्या माहितीनुसार, या स्क्रॅप पॉलिसीमुळे मंद झालेल्या वाहन विक्री विभागाला आणि वाहन क्षेत्राला चालना मिळणार असून नवीन वाहन घेण्यासाठी नागरिक पुढे येतील. ऑगस्ट महिन्यात वाहनविक्रीचा दर हा सर्वात खाली राहिला असून पॅसेंजर वाहनांची विक्री मोठ्या प्रमाणात घसरली आहे.

Visit : Policenama.com