सलमान खानच्या काळवीट शिकार प्रकरणाला नवं वळण, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्यावर मागिल अनेक वर्षापासून काळवीट शिकार प्रकरणाचा खटला सुरु आहे. 5 फेब्रुवारी 2021 रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान सलमान खानला जोधपूर हायकोर्टाकडून काळवीट शिकार आणि आर्म्स ॲक्ट प्रकरणात दिलासा दिला होता. मात्र, आता या खटल्यात नवा ट्विस्ट आला आहे.

सलमाननं या प्रकरणात खोट शपथपत्र दाखल केल्याबद्दल माफी मागितली आहे. मंगळवारी त्यानं ही माफी मागितली. त्यानं हे सगळं चुकून झाल्याची कबुली दिली आहे. हे शपथपत्र 18 वर्षापूर्वी 2003 साली जोधपूर सेशन कोर्टापुढे सादर करण्यात आले होते. या प्रकरणावर 1988 पासून सुनावणी सुरु आहे. गुरुवारी (दि.11) या प्रकरणात अंतिम निकाल दिला आहे. सलमानवर त्यानं शूटिंगदरम्यान काळवीट शिकार केल्याचा आरोप आहे.

दोन दशकापासून सुरु असलेला खटला अंतिम टप्प्यात आला आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, सलमान खानचे वकील हस्तीमल सारस्वत यांनी म्हटलं आहे की, 8 ऑगस्ट 2003 मध्ये न्यायालयात चुकून खोटं शपथपत्र दिलं होतं. याशिवाय सलमान व्यस्त असल्याने त्याचं लायसन्स रिन्यू व्हायला गेलं आहे हे विसरला होता. आणि त्यानं कोर्टात म्हटलं होतं की, त्याचं लायसन्स सापडत नाही. आर्म अॅक्टखाली दाखल झालेल्या गुन्ह्यात त्याला लायसन्स कोर्टात सादर करण्यास सांगितले होते.

काय आहे प्रकरण ?
सलमान खानच्या विरोधात जोधपुरच्या वेगवेगळ्या न्यायालयात गेल्या दोन दशकांपासून अनेक केसेस सुरु आहेत. सलमान खानने हम साथ साथ है या चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान 1998 मध्ये राजस्थानमध्ये काळवीटाची शिकार केली होती. हा आरोप न्यायालयात सिद्ध झाल्यानंतर त्याला सहा दिवस जोधपूर तुरुंगात घालवावे लागले होते. यानंतर या शिक्षेला हायकोर्टाने स्थगिती दिली होती. या प्रकरणात सलमान खान याला दोन वेळा जधपूर तुरुंगात जावे लागले होते. या प्रकरणात सलमान खान याच्या व्यतिरिक्त तब्बू, सोनाली बेंद्रे, सैफ अली खान आणि निलम यांच्यावर देखील आरोप करण्यात आले होते.