लसीकरण झालेल्या नागरिकांसाठी अमेरिकेची नवी नियमावली जारी !

अमेरिका : वृत्तसंस्था –  जगात कोरोनाने हाहाकार केला आहे. अनेक देश कोरोना विषाणूला रोखण्यासाठी अनेक त्याच्याशी सामना करताना दिसत आहेत. इस्रायल देशानंतर आता अमेरिकेने एक मोठी घोषणा केली आहे. अमेरिकेमध्ये पूर्णपणे लसीकरण झालल्या लोकांनी मास्क घालणे अथवा सामाजिक अंतर राखणे आवश्यक राहिलेले नाही. अशा संदर्भात अमेरिकेच्या रोग नियंत्रण व प्रतिबंध केंद्राकडून (CDC) मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहे.

अमेरिकेची प्रमुख आरोग्य संस्था CDC ने एप्रिलच्या शेवटच्या आठवडी स्पष्टपणे अमेरिकी नागरिकांना मास्क न घालण्याची सूचना दिली गेली होती. ज्या नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरण पूर्ण केले आहे, त्यांनी अनोळखी लोकांची गर्दी सोडून इतर कुठेही फिरताना मास्क घालण्याची गरज नसल्याचे त्यांनी म्हटले होते. आताच्या जारी केलेल्या सूचनेनुसार अमेरिकेतील नागरिक आज कुठेही मास्क न लावता फिरू शकता असे त्यामध्ये नमूद करण्यात आले आहे.

CDC च्या मार्गदर्शक सूचनांनुसार, मास्क फ्री देश बनण्याबरोबरच कोरोना दूर ठेवण्यासाठी सामाजिक अंतर पाळावे लागत होते, ते सुद्धा आता लस घेतलेल्या नागरिकांनी पाळण्याची आवश्यकता नाही. कोरोना प्रतिबंधक लसीचे २ डोस घेतलेले नागरिक आता त्यांची रोजही कामे संकोच न करता करू शकणार आहे. . परंतु, ज्या संघीय, र्जाय, आदिवासी, लोकल बिझनेस, या कामाच्या ठिकाणी तेथे मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. तिथे मास्क घालणे आवश्यक आहे असे या नव्या नियमावलीत नमूद केले आहे. या दरम्यान, कोरोना संकटाच्या लढ्यात अमेरिकेमधून मोठी दिलासादायक बातमी येत आहे. म्हणजे अन्न व औषध प्रशासनाकडून (FDA) १२ ते १५ वयोगटातील मुलांच्या कोरोना लसीकरणाला संमती देण्यात आली आहे. फायझर-बायोएनटेकने ही कोरोना लस तयार केली आहे. ही लस किशोरवयीनांना दिली जाणार आहे.