New Wage Code | लागोपाठ 5 तासांपेक्षा जास्त काम करू शकत नाहीत कर्मचारी ! 30 मिनिटाचा ब्रेक देणे आवश्यक, जाणून घ्या नवीन नियम

नवी दिल्ली : वृत्त संस्था – New Wage Code | ऑफिस, मिल, फॅक्टरीत काम करणारे कर्मचारी, मजूर, वर्करसाठी आगामी जुलै महिना मोठे बदल घेऊन येऊ शकतो. कारण नवीन वेज कोड (New Wages Code) च्या चर्चेने पुन्हा एकदा जोर पकडला आहे. 1 एप्रिलपासून नवीन वेज कोड लागू होणार होता, परंतु कामगार मंत्रालयाने हा निर्णय पुढे ढकलला. आता तो जुलैपासून केला जाऊ शकतो.

जर असे झाले तर नोकरी करणार्‍या लोकांच्या सॅलरी स्ट्रक्चरमध्ये सुद्धा मोठा बदल होईल.
सॅलरी कमी होईल आणि पीएफ योगदान वाढेल.
कर्मचार्‍यांना 12 तास काम करावे लागू शकते.
नवीन वेज कोड जाणून घेवूयात…

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

सरकारने 29 कामगार कायद्यांचे मिळून 4 नवीन वेज कोड तयार केले आहेत-
1- इंडस्ट्रियल रिलेशन्स कोड (Industrial Relations Code)
2- कोड ऑन ऑक्यूपेशन सेफ्टी (Code on Occupational Safety)
3- हेल्थ अँड वर्किंग कंडीशन्स कोड (OSH) (Health and Working Conditions Code)
4- सोशल सिक्युरिटी कोड आणि कोड ऑन वेजेस (Social Security Code and Code on Wages)

वेज कोड अ‍ॅक्ट (Wage Code Act), 2019 नुसार, एखाद्या कर्मचार्‍याची बेसिक सॅलरी कंपनीच्या खर्चाच्या (Cost To Company-CTC) 50 टक्केपेक्षा कमी असू शकत नाही.
सध्या अनेक कंपन्या बेसिक सॅलरी खुप कमी करून वरील भत्ते जास्त देतात,
जेणेकरून कंपनीवर भार कमी पडावा.

सॅलरी स्ट्रक्चर बदलणार

पीएफ आणि ग्रॅच्युटी सारख्या इतर घटकांसाठी कर्मचार्‍यांचे योगदान वाढेल. न्यू वेज कोड लागू झाल्यावर बोनस, पेन्शन, वाहन भत्ता, घरभाडे भत्ता, निवास लाभ, ओव्हरटाइम इत्यादी बाहेर होईल.
कंपन्यांना हे ठरवावे लागेल की, बेसिक सॅलरी सोडून सीटीसीमध्ये समावेश केलेले काही इतर घटक 50 टक्केपेक्षा जास्त होऊ नयेत आणि उर्वरित अर्ध्यात बेसिक सॅलरी असावी.

लागू करण्याची डेडलाईन जुलै
1 एप्रिलपासून नवीन वेज कोड लागू होणार होता,
परंतु कामगार मंत्रालयाने हा निर्णय पुढे ढकलला.
आता तो जुलैपासून केला जाऊ शकतो.

कामाचे तास, सुट्ट्यांवर होणार परिणाम
नवीन ड्राफ्ट कायद्यात कामकाजाचे कमाल तास वाढवून 12 करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे.
कोडच्या ड्राफ्ट नियमांत 15 ते 30 मिनिटांच्या दरम्यानच्या अतिरिक्त कामकाजाला सुद्धा 30 मिनिटे मोजून ओव्हरटाइममध्ये समावेश करण्याची तरतूद आहे.
सध्या नियमात 30 मिनिटापेक्षा कमी वेळ ओव्हरटाइम योग्य मानली जात नाही.

पीएमध्ये होईल बदल
नवीन ड्राफ्ट रूलनुसार, मुळे वेतन एकुण वेतनाच्या 50% किंवा जास्त असावे.
यामुळे बहुतांश कर्मचार्‍यांच्या वेतनाच्या स्ट्रक्चरमध्ये बदल होईल.
टेक होम सॅलरी कमी होईल आणि पीएफची अमाऊंट वाढू शकते.
नवीन वेतन कोड लागू झाल्यानंतर कंपनीला सीटीसीच्या 50 टक्के मूळ वेतनाच्या (बेसिक सॅलरी) रूपात कर्मचार्‍याला द्वावे लागेल.

5 तास लागोपाठ काम करू शकत नाही
ड्राफ्ट नियमात कोणत्याही कर्मचार्‍याकडून सलग 5 तासापेक्षा जास्त काम करून घेण्यास मनाई आहे.
म्हणजे 12 तासाच्या एकुण कामात प्रत्येक पाच तासानंतर अर्धातास विश्रांती द्यावी लागेल.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Titel : New Wage Code : Employees cannot work continuously for more
than 5 hours! It is necessary to give a break of 30 minutes, know the new rules

हे देखील वाचा

COVID-19 vaccine tips | सर्दी, खोकला, तापासारख्या कोरोनाच्या लक्षणांनी पीडित लोक लस घेऊ शकतात का?

सचिन वाझेच्या पुनर्नियुक्तीशी अनिल देशमुखांचा थेट संबंध नाही; उच्च न्यायालयात युक्तिवाद

Panchavati Express | खूशखबर ! मुंबई- नाशिक धावणारी ‘पंचवटी’ अन् ‘जनशताब्दी’ एक्स्प्रेस उद्यापासून पुन्हा प्रवाशांच्या सेवेत

Bank Holidays in July 2021 । जुलैमध्ये एकूण 15 दिवस बँका राहणार बंद, जाणून घ्या सुट्टयांची यादी