New Year 2021 : ‘महामारी’ची भविष्यवाणी करणाऱ्या बिल गेट्स यांनीच सांगितलं, कसं असेल नववर्ष 2021

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सह- संस्थापक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जाणारे बिल गेट्स यांनी कोरोना साथीच्या आजाराशी लढणाऱ्या जगाबद्दल आपले मत व्यक्त केलं आहे. त्यांनी सांगितले की, कोरोनाविषयी सतर्क राहिले पाहिजे. तसेच व्हायरस विरुद्ध लढणाऱ्या 2021 साठी अपेक्षा वाढवणारा असेल, असा विश्वास त्यांना आहे. येत्या काळात गोष्टी सामान्य होऊ शकतात. बिल गेट्स यांनी आपल्या ब्लॉगच्या नवीन पोस्टमध्ये येणारे 2021 वर्ष हे शोकांतिका असल्याचे वर्णन केलं आहे.

बिल गेट्स यांनी लिहिलेल्या या पोस्टमध्ये त्यांनी स्पष्ट केले की, 2021 हे सहज सोपे वर्ष असणार नाही. संगणकाच्या मॉडेल्सनुसार कोरोनाच्या नवीन स्ट्रेनमुळे 2021 चा पहिला महिना खूपच कठीण असू शकतो आणि म्हणूनच या नवीन स्ट्रेनला लवकर नियंत्रित करण्याची आवश्यकता आहे. दरम्यान, ते 2021 बद्दल सकारात्मक आहेत.

बिल गेट्स यांनी लिहिलं आहे की, पुढील वर्ष सकारात्मक होण्याची दोन कारणे आहेत. एक म्हणजे मास्क, सोशल डिस्टेंसिंग आणि इतर प्रयत्नांमुळे विषाणूचा फैलाव होण्याचा धोका कमी होईल आणि लसीच्या परिणामामुळे येत्या काही महिन्यांत जागतिक स्तरावर बदल दिसून येतील. या विषयी सांगताना त्यांनी जगभरातील शास्त्रज्ञांचे अभार मानले आहे. कारण कोरोना विरुद्धच्या लढईत फायझर मॉर्डेना आणि ऑस्ट्रॅजेनेकासाऱ्या लसींना यश मिळाले आहे.

गेट्स पुढे लिहितात, जागतिक पातळीवर होत असलेल्या सहाकार्यामुळे 2021 बाबत मी थोडासा सकारात्मक आहे. मला असे वाटते की जगाने केवळ साथीच्या आजारावर नियंत्रण ठेवण्याची गरज नाह तर आपल्या काळाची सर्वात कठीण समस्या म्हणजे हवामान बदलाच्या दिशेने आवश्यक पावले उचलणे देखील आवश्यक आहे.

बिल गेट्स यांनी साथीच्या रोगाविषयी झालेल्या 2018 च्या चर्चेत सांगितले होते की, लवकरच जगाला साथीच्या रोगाचा सामना करावा लागू शकतो. अमेरिकन शहरातील वैद्यकीय संस्था आणि इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनच्या वतीने आयोजित या सभेत गेट्स म्हणाले होते, येत्या काळात साथीच्या रोगाला रोखण्यासाठी युद्धपातळीवर तयारी करावी लागेल अन्यथा सहा महिन्यांत या साथीच्या रोगांमुळे 30 दशलक्ष लोकांना मृत्युचा सामना करावा लागू शकतो.