Aishwarya IPS नं त्यांना ओळखू न शकणाऱ्या महिला कॉन्स्टेबलला दिली ‘शिक्षा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   केरळ (Kerala) येथील कोची येथे पोलीस उपायुक्त ऐश्वर्या आयपीएस (Aishwarya IPS) यांनी पोलीस स्टेशनच्या सुरक्षेत तैनात एका महिला कॉन्स्टेबलला केवळ यामुळे शिक्षा म्हणून ट्रॅफिक पोलिसच्या ड्यूटीवर पाठवले कारण महिला कॉन्स्टेबल त्यांना साध्या वर्दीत ओळखू शकल्या नाहीत.

काय झालं होतं?

महिला पोलीस कॉन्स्टेबल केरळ मधील कोची येथील नॉर्थ टाऊन पोलिस स्टेशनच्या मुख्य गेटच्या सुरक्षेमध्ये तैनात होत्या. दरम्यान, 1 जानेवारी रोजीच आपला पदभार स्वीकारणाऱ्या ऐश्वर्या आयपीएस जेव्हा साध्या गणवेशात पोलिस स्टेशनची पाहणी करण्यासाठी आल्या तेव्हा महिला पोलीस कॉन्स्टेबल त्यांना ओळखू शकल्या नाहीत. यामुळे ऐश्वर्या आयपीएस नाराज झाल्या.

मिळालेल्या माहितीनुसार, ऐश्वर्या आयपीएसने त्या महिला कॉन्स्टेबलला असं सांगून शिक्षा दिली की गेटवर तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर सर्वात जास्त जबाबदारी असते. त्यांनी सर्वात जास्त सावध राहिले पाहिजे. पण जेव्हा त्या पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्या तेव्हा महिला कॉन्स्टेबल सतर्क नव्हत्या.

महिला पोलीस कॉन्स्टेबलसाठी न्यायाची मागणी

यानंतर केरळ पोलीस असोसिएशनने हा मुद्दा उचलून धरला आणि महिला कॉन्स्टेबलला ड्युटीवरून न काढण्याची मागणी केली. याशिवाय ऐश्वर्या आयपीएसवर कारवाई करण्याची मागणीही केली. त्यानंतर हे प्रकरण चिघळत असल्याचे पाहून शहर पोलीस आयुक्त नागाराजू यांनी हस्तक्षेप केला.

आयपीएस ऐश्वर्या यांना देण्यात आला इशारा

इंडियन एक्स्प्रेसच्या हवाल्याने वृत्त समोर आले की शहर पोलीस आयुक्त नागाराजू यांनी महिला कॉन्स्टेबलच्या बाबतीत आयपीएस ऐश्वर्या यांना इशारा दिला आहे की, भविष्यात त्यांनी अशी चूक कधीही करू नये. शहर पोलीस आयुक्तांचे असे म्हणणे आहे की आयपीएस ऐश्वर्या अजून यंग आहेत आणि त्यांना अनुभव देखील कमी आहे, त्यामुळे अशी चूक झाली.

विशेष म्हणजे ऐश्वर्या आयपीएसने पोलिस स्टेशनपासून थोड्या अंतरावर आपली सरकारी कार उभी केली होती आणि त्या साध्या गणवेशातच होत्या, त्यामुळेच महिला कॉन्स्टेबल त्यांना ओळखू शकल्या नाहीत.