‘त्यानं’ अभिनेत्रीला पाठवलं 16 किलोचं ‘पार्सल’, अडचणीत आलेल्या ऐश्वर्यानं त्यावेळी केलं होतं ‘असं’ काही

पोलीसनामा ऑनलाइन टीम – ही घटना आहे सप्टेंबर 2006 मधील. बेलाड स्टेट पोस्ट ऑफिसमध्ये 16 किलो वजनाचे एक पार्सल आले. ते पार्सल होते ऐश्वर्या रॉयच्या नावावर. या पार्सलवर कस्टम विभागाचे नियंत्रण असल्याकारणाने संशयाच्या आधारे ते पार्सल खोलून बघने गरजेचे होते. मात्र पार्सल खोलायच्या आधी अभिनेत्री ऐश्वर्या रॉयला एक पत्र लिहून कळविण्यात आले की, तुम्ही नसताना तुमचे पार्सल उघडून बघितले जाईल. पण त्यावेळी ऐश्वर्या रॉय जयपूरमध्ये जोधा अकबरच्या शुटिंगमध्ये व्यस्त होती. त्यामुळे ती हजर राहू शकली नाही. तेव्हा ऐश्वर्याच्या गैरहजेरीत कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पार्सल उघडले.

पार्सल उघडल्यानंतर मात्र कस्टमचे अधिकारी हैराण झाले, स्तब्ध झाले. कारण पार्सलमध्ये काही इलेक्ट्रिक वस्तू, डिव्हीडी प्लेअर आणि एका शर्टमध्ये काही युरोज होते. त्या युरोजची किंमत भारतीय चलनानुसार 13 लाख रुपये होती. एवढ्या प्रमाणात विदेशी मुद्रा मिळल्यामुळे ऐश्वर्याला कस्टम विभागाने कारणे दाखवा नोटिस बजावली. ऐश्वर्याचे वकिल गिरिष कुलकर्णी यांनी माहिती देताना की, पार्सल पाठवणाऱ्यांचे नाव आहे अविनेश्वर.  पार्सल नेदरलॅंन्डवरुन पाठवण्यात आलं आहे. मात्र ऐश्वर्या त्यांना ओळखत नाही. अविनेश्वर यांनी कोणत्या कारणाने ऐश्वर्याला हे पाठवले आहे ? हे आम्हाला माहिती नाही.

नंतर ऐश्वर्या, तिची आई व वकिल यांच्यासोबत कस्टम विभागातील अधिकाऱ्यांना भेटली व स्पष्टीकरण दिले की, “मी आयफा अवाॅर्डसाठी नेदरलॅंन्ड गेली होती, पण मी पार्सल पाठवणाऱ्याला बिलकुल ओळखत नाही. त्यांच्या सोबत माझा काहीही संबंध नाही, नाते गोते नाही.” ऐश्वर्याचे बाजु ऐकुण घेतल्यानंतर कस्टम विभागाला पुर्णपणे विश्वास झाला व त्यांनी ऐश्वर्याला क्लिन चिट दिली. ते किमती पार्सल पाठवुन दिले.