अमेरिकेत H1 B व्हिसाधारक भारतीयांना मोठा दिलासा, पती अथवा पत्नी काम करू शकतील

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेमध्ये H1B व्हिजावर काम करणाऱ्या हजारो भारतीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. अमेरिकेच्या न्यायालयाने ओबामा सरकारच्या नियमाला रद्द करण्यास नकार दिला असून यामध्ये H1B या व्हिजावर तेथे काम करणाऱ्या पती किंवा पत्नींपैकी कोणत्याही एकाला आपल्या जोडीदाराबरोबर राहण्यास परवानगी देण्यात आली आहे.

कोलंबियामधील न्यायालयाने या प्रकरणाला पुन्हा खालील न्यायालयात विचारासाठी पाठवले असून यावर पुन्हा एकदा विचार करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. H1B हा गैर प्रवासी व्हिजा असून नोकरीपेक्षा नागरिकांसाठी हा व्हिजा फार उपयुक्त आहे. यामध्ये अमेरिकन कंपन्या आपल्या कंपनीत काम करणाऱ्या विदेशी नागरिकांना त्यांच्याबरोबर अमेरिकेत एका व्यक्तीला आणण्यास परवानगी देते. या नियमाचा सर्वात जास्त फायदा हा भारतीय महिलांना होत आहे. ज्यांचे पती अमेरिकेत नोकरीस आहेत त्या महिला या व्हिजाच्या आधारावर अमेरीकेत वास्तव्य करू शकतात.

अमेरिकेतील कर्मचारी देखील या नियमाविरोधात असून ट्रम्प सरकारच्या बाजूने आहे. दरम्यान, हा नियम रद्द झाल्यानंतर अमेरिकेत काम करणाऱ्या हजारो भारतीय नागरिकांना याचा मोठा फटका बसणार असून जोपर्यंत त्यांना ग्रीनकार्ड मिळत नाही तोपर्यंत भारतीय त्यांच्या पत्नीला बरोबर नेऊ शकणार नाहीत.

Visit : Policenama.com