कारगील विजय दिन विशेष : कारगील युद्धात मुलाचे बलिदान आता नातू करतोय सीमेवर रखवाली, शंकर सिंहची चौथी पिढी देशाच्या सेवेत

सांबा : पोलीसनाम ऑनलाइन – शंकर सिंह यांचे पुत्र लखविंदर सिंह १९९९ मध्ये टायगर हिलवर शस्त्रुशी लढताना शहीद झाले. आता त्यांचा नातू लखविंदर सिंह यांचा मोठा मुलगा सतविंदर सिंह त्याच रेजिमेंटमध्ये देशासाठी सेवा देत असून सध्या तो सीमेवर तैनात आहे. त्यांचा छोटा मुलगाही सेनेत भर्ती होण्याची तयारी करीत आहेत.

जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यातील सीमेलगतच्या सारथी खुर्द गावात शंकर सिंह राहतात. ते स्वत: सीमा सुरक्षा दलात निरीक्षक पदावरुन सेवा निवृत्त झाले आहेत. त्यांचे तीनही मुले सैन्यात भरती झाले होते. कारगील युद्धाच्या वेळी त्यांचे पुत्र लखविंदर सिंह हे पठाणकोटमध्ये सेनेच्या आठ शिख रेजिमेंटमध्ये शिपाई म्हणून तैनात होते. युद्ध सुरु झाल्यावर त्यांना टायगर हिलवर पाठविण्यात आले. ६ जुलै ला टायगर हिलवर पाकिस्तानी सैनिकांबरोबर झालेल्या समोरासमोरच्या युद्धात ते शहीद झाले. मात्र, तरीही त्यांची पत्नी कुलदीप कौर यांनी आपल्या दोन्ही मुलांना व शंकरसिंह यांनी आपल्या दोन्ही नातवांमध्ये देशभक्ती त्यांच्यात ठासून भरली. हे दोघेही आपल्या वडिलांच्या बहादुरीचे किस्से एैकूनच मोठे झाले. या त्याग आणि बलिदानाच्या परंपरेतून त्यांचा मोठा मुलगा सतविंदर सिंह आज आपल्या वडिलांच्याच शीख रेजिमेंटमध्ये तैनात आहे. आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत देशाची सेवा करीत आहे. त्यांचा छोटा भाऊ सैन्यात भरती होण्याची तयारी करीत आहे.

Image result for kargil vijay diwas

शंकर सिंह यांच्या घरातील परंपरा इथंच थांबत नाही. शंकर सिंह यांचे तीनही मुले सैन्यात भरती झाले होते. लखविंदर कारगील युद्धात शहीद झाला तर दुसरा मुलगा सैन्यात नोकरी करीत असताना अस्वस्थतेमुळे त्याचा मृत्यु झाला होता. तिसरा मुलगा ओमकार सिंह सध्या १३ शिख रेजिमेंटमध्ये कार्यरत आहेत. शंकर सिंह यांचे वडिल वीरसिंह हेही सैन्यात जेक रायफलचे जवान होते. लखविंदर यांना सैन्यात जाण्याची प्रेरणा त्यांच्या आजोबांकडून मिळाली. आता लखविंदर यांच्याकडून प्रेरणा घेऊन त्यांचा पुत्र सैन्यात दाखल झाला आहे.

Image result for kargil vijay diwas

लखविंदर यांचे बालपणापासूनच सेनेत भरती होण्याचे स्वप्न होते. ते १९९० मध्ये सैन्यात दाखल झाले. १९९४ मध्ये त्यांचा बलजीत कौर यांच्याशी विवाह झाला. विवाहानंतर पाच वर्षात देशासाठी लढताना ते शहीद झाले. आम्हाला आमच्या मुलावर गर्व आहे. त्यामुळे आम्ही आमच्या नातवालाही बहादुर बनविले जेणे करुन तोही देशाची सेवा करेल, असे शंकरसिंह यांचे म्हणणे आहे.

Image result for kargil vijay diwas

आरोग्यविषयक वृत्त –