खुशखबर ! मुंबई-पुणे-मुंबई ‘इंटरसिटी’ एक्सप्रेस सुसाट ; केवळ अडीच तासात कापणार अंतर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबई -पुणे -मुंबई धावणाऱ्या इंटरसिटी एक्सप्रेसच्या प्रवाशांसाठी आता एका आनंदाची बातमी आहे. येत्या ३१ तारखेपासून इंटरसिटी एक्सप्रेस ७ दिवसांकरिता नवीन वेळापत्रकानुसार धावणार आहे. विशेष म्हणजे या नव्या वेळापत्रकानुसार केवळ २ तास ३५ मिनिटात ही गाडी पुणे गाठणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा तब्बल पाऊण तास वाचणार आहे.

याबाबत मिळलेली अधिक माहिती अशी की, पुवीर्चे अंतर कमी करण्याकरिता इंटरसिटी एक्सप्रेसची ‘पुश-पूल’ प्रकारे चालवण्याची चाचणी घेण्यात आली होती, ती यशस्वी झाली आणि रेल्वे बोर्डाने ७ दिवस नवीन वेळापत्रकाप्रमाणे गाडी चालवण्यास परवानगी दिली आहे. जर ही गाडी या ट्रायलच्या ७ दिवसात व्यवस्थित, तसेच बाकीच्या गाड्यांच्या वेळेला धक्का न लावता चालू राहिली तर मात्र इंटरसिटी एक्सप्रेसचे हेच वेळापत्रक कायम ठेवले जाणार आहे. येत्या ३१ मे पासून म्हणजेच उद्यापासून सीएसएमटी वरून ६.४० ला सुटणारी गाडी ६.४५ ला सुटेल, तर पुण्यात ९.५७ च्या ऐवजी ९.२० ला पोहचेल. तसेच तर पुण्याहून ५.५५ ला सुटणारी गाडी ६.३० ला सुटेल आणि सीएसएमटीला ९.०५ ला पोहचेल.

मुंबई -पुणे- मुंबई असा नेहमी प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. महामार्गाने प्रवास करायचा झाल्यास ३ ते साडे तीन तास लागतात. मात्र इंटरसिटीच्या नव्या वेळापत्रकानुसार केवळ २ तास ३५ मिनिटात हे आंतर कापले जाणार आहे. सध्या इंटरसिटीने हे आंतर कापण्यासाठी ३ तास १७ मिनिटे लागतात. नव्या वेळापत्रकानुसार हे अंतर कमी होऊन मुंबईहून निघणारी इंटरसिटी एक्सप्रेस केवळ २ तास ३५ मिनिटात पुण्यात पोहचेल.