प्लास्टिकचा वापर करणाऱ्या विक्रेत्यांना दंड शहराताल बाजारपेठेत महापालिका पथकाची कारवाई

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – प्लास्टिक पिशव्यांचा वापर व विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर आज महापालिकेच्या पथकाने ही कारवाई केली. शहरातील बाजारपेठेतील तीन विक्रेत्यांना १२ हजारांचा दंड आकारला आहे. तसेच प्लास्टिकच्या साठा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे.

राज्य शासनाने प्लास्टिक बंदी केलेली असतानाही शहरातील अनेक दुकानांमध्ये प्लास्टिकचा सर्रास वापर केला जात असल्याचे आढळून येते. त्यामुळे महापालिका पथक शहरातील बाजारपेठेत तपासणी केली. विजय प्लॅस्टिक (तेलीखुंट), हरजीवन भाईचंद किराणा स्टोअर्स (गंजबाजार) व संतोष बोरा (आडते बाजार) या ठिकाणी प्लॅस्टिकच्या पिशव्या आढळून आल्या. संबंधितांकडे असलेला प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त करून त्यांच्यावर १२ हजारांचा दंड ठोठावला आहे. फाईव्हस्टार ट्रेडिंग यांना कचरा टाकल्याप्ररकणी २०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

माळीवाडा प्रभाग कार्यालयाचे स्वच्छता निरीक्षक किशोर देशमुख, सहाय्यक स्वच्छता निरिक्षक बाळासाहेब विधाते, सुरेश मिसाळ, गोरख भालेराव, प्रसाद उमाप, अजय सौदे, ज्ञानेश्‍वर झारेकर आदींच्या पथकाने ही कारवाई केली. शहरात प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्यांविरुद्ध कारवाईची मोहीम सुरूच ठेवण्यात येईल, असे महापालिका सांगण्यात आले आहे.

‘किडनी स्टोन’ वर घरगुती रामबाण उपाय

Video : अभिनेत्री सनी लियोनीच्या सौंदर्याचं ‘राज’

तुमची त्वचा शुष्क आहे का? मग हे उपाय करून पाहा

फरार असलेले दिलीप तिडके अखेर लाचलुचपत अधिकाऱ्याच्या जाळ्यात

खुशखबर ! निवृत्तीचे वय वाढविण्याचा सरकारचा विचार

सावधान ! ‘कॅन्सर’ला धुम्रपानापेक्षा लठ्ठपणा अधिक कारणीभूत