शिवजन्मोत्सवाचा रंगणार शानदार सोहळा, कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने आयोजन

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन – हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वा. बाजार समिती प्रांगणात भव्य शिवजन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले असुन त्या निमित्त शिवव्याख्यान आयोजीत केले आहे. अशी माहीती कृउबास चे सभापती अनिलराव नखाते यांनी दिली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार शिवश्री बाबाजाणी दुर्राणी हे राहणार आहेत तर प्रमुख व्याख्याते म्हणून आंबाजोगाई येथील सुप्रसिद्ध व्याख्याते शिवश्री अविनाश धायगुडे यांची उपस्थिती राहणार आहे. याप्रसंगी कृउबास चे सभापती अनिलराव नखाते, उपसभापती एकनाथराव शिंदे संचालक माधवराव जोगदंड, प्रभाकर शिंदे, बाळासाहेब कोल्हे, सुरेश ढगे, लहु घांडगे, रूस्तुम झुटे, गणेश घुंबरे, नारायणराव आढाव, राजेश्वर गलबे, भगीरथ टाकळकर, एकनाथ सत्वधर, दगडुबा दुगाणे, विश्वांभर साळवे, बाबासाहेब कुटे, सय्यद गालेब, आश्रोबा शिंदे, प्रभारी सचिव बि. जी. लिपने यांची उपस्थिती राहणार आहे.

पाथरी कृषी उत्पन्न बाजार समिती ने अल्पावधीतच कुशल प्रशासन चालवित महाराष्ट्रात भुषणावह अशी नाविण्यपूर्ण अशी स्वतः ची भव्य प्रशासकीय ईमारत उभी केली. शासकीय विश्रामगृहाच्या धर्तीवर उभारण्यात आलेली हि ईमारत अनेकांचे लक्ष वेधुन घेत आहे. विशेष बाब म्हणजे पाथरी शहराचे वैभव असणारा छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वरूढ पुतळा या बाजार समिती प्रांगणात स्थापीत करण्यात आलेला आहे. शिवजन्मोत्सवाचे निमितांने येथे बाजर समितीच्या वतीने विशेष अशा शिवजन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमास अधिकारी, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, सरपंच, चेअरमन, विविध कार्यकारी सोसायटी चे संचालक, व शेतकरी बांधवांनी उपस्थितीत रहावे असे आवाहन प्रसिद्धी प्रमुख प्रकाश पाठक यांनी केले आहे. या सोहळ्यानिमित्त विविध स्वागत कमानी उभारण्यात आल्या असुन भगवे ध्वज यामुळे एक आनंदायी वातारणात होणारा हा सोहळा लक्षवेधक ठरणार आहे.