Video : शिक्षक बँकेच्या चेअरमन निवडीपूर्वीच ‘फ्री स्टाईल’ हाणामारी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – अहमदनगर प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या चेअरमन, व्हाईस चेअरमन निवडीपूर्वीच बँकेसमोरच संचालकांची हाणामारी जुंपली. रस्त्यावरच ‘फ्री-स्टाईल’ सुरू झाल्याने बघ्यांची गर्दी झाली होती.

आज प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या पदाधिकारी निवडीसाठी बैठक आयोजित करण्यात आली आहे. गुरुमाऊलीच्या माजी चेअरमन व मंडळाचे अध्यक्ष बापू तांबे यांचेच दोन गटांत फ्री स्टाईल धराधरी सुरू झाली. नगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या आज होणाऱ्या अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या निवडीवरून हा वाद सुरु झाला. निवडी अगोदरच शिक्षकांमध्ये चांगलाच वादंग निर्माण झाला. विशेष म्हणजे संचालकाला दमदाटी करून धक्काबुक्की करण्याचा प्रकार भररस्त्यावर घडल्यामुळे शहरांमध्ये बघ्यांची गर्दी झाली होती.

शिक्षक सहकारी बँकेत होणारी भांडणे नित्याचीच झाली आहेत. त्याला पदाधिकार्‍यांच्या निवडी ही अपवाद ठरले नाहीत.