पिसर्वेचे सरपंच बाळासाहेब कोलते यांचे काम ‘त्या’ आमदारा सारखे

पुरंदर : पोलीसनामा ऑनलाइन  –   कोरोना साथीच्या काळात पारनेर (जि. अहमदनगर) चे आमदार निलेश लंके यांच कोरोनाग्रस्तांमधील काम आणि त्यांची तडफ लोकांनी पहिली. त्यांची प्रेरणा घेत अनेक गावांमध्ये कोविड केअर सेंटर सुरू झाली. मात्र ती सगळीच चालली असे नाही. काही राजकीय महत्वाकांक्षा म्हणून चालली . मात्र पुरंदर तालुक्यातील पिसर्वेतील कोविड केअर सेंटरची “बात काही वेगळीच” आहे.

आमदार निलेश लंके यांच्या प्रमाणेच पिसर्वेचे सरपंच बाळासाहेब कोलते यांनी कोरोना प्रतिबंधास प्राधान्यक्रम दिला असून ग्रामपंचायतीचे केवळ सदस्यच नव्हे तर शासकीय कर्मचाऱ्यांना देखील हाताशी धरत त्यांनी कोविड च्या विरोधात मोहीम उघडली आहे. तेही कोणत्याही शासकीय अथवा राजकीय मदतीशिवाय.

सकाळच्या चहा नाष्ट्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत, रुग्णाच्या औषधोपचारांपासून ते त्यांच्या तपासणी पर्यंत सर्व गोष्टींवर बारीक लक्ष ठेऊन असणारे सरपंच बाळासाहेब कोलते वेळ प्रसंगी कोविड केअर सेंटर मध्ये जाऊन रुग्णांशी बोलून त्यांचा आत्मविश्वास, मनोधैर्य वाढविण्याचा प्रयत्न करतात.

पिसर्वेकर जनतेने मला त्यांच्यासाठी निवडून दिले आहे. त्यामुळे या अशा कठीण प्रसंगी त्यांच्यासोबत उभे राहणे माझे कर्तव्य असल्याचे म्हणणाऱ्या बाळासाहेबांनी ग्रामसेवक जाधव, श्री.भानुदास कोलते, चंद्रकांत ऊर्फ बापूराव कोलते,नवनाथ पोपट कटके,सुनील जगन्नाथ कोलते, विठ्ठल सुभाष कोलते,नितीन शिवाजी कोलते, तेजस राजेंद्र कोलते (गुल्लू), कैलास आण्णा कोलते, सुभाष किसन कोलते (बाळातात्या) शामराव गुलाब वायकर, डॉ.देविदास नवले, डॉ. विलास सुर्यवंशी, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र पिसर्वेचे आरोग्यसेवक नवनाथ जायभाय, सुनिल कदम, आरोग्यसेविका दिप्ती दुर्गाडे-भोंगळे, प्रियांका भोसले- जगताप,ग्रामपंचायत सदस्य,कर्मचारी,गावातील ग्रामस्थ या आणी अशाच अनेक ज्ञात अज्ञात सहकाऱ्यांच्या मजबूत खांद्यावर या कोविड सेंटरचे आव्हान पेलले आहे.