News Police Stations In Pune | सिंहगड रोड, भारती विद्यापीठ, हडपसर, लोणी काळभोर, लोणीकंद, चंदनगर आणि चतुःश्रृंगी पोलिस स्टेशनचे लवकरच विभाजन !

15 ऑगस्टपुर्वी नांदेड सिटी, आंबेगाव, फुरसुंगी, काळेपडळ, वाघोली, चंदनगर आणि बाणेर पोलिस स्टेशन कार्यान्वीत होणार?

पुणे : (नितीन पाटील) – News Police Stations In Pune | पुणे पोलिस आयुक्तालयामध्ये सध्या 33 पोलिस स्टेशन कार्यान्वीत आहेत. मात्र, झपाटयाने होणारे शहरीकरण आणि वाढणारी लोकसंख्या लक्षात घेऊन आणखी 7 नवीन पोलिस स्टेशन लवकरच कार्यान्वीत करण्यात येणार आहेत. त्याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडे (Maharashtra State Govt) पाठविण्यात आला असून त्याचा पाठपुरावा घेतला जात असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, सिंहगड रोड पोलिस स्टेशन (Sinhagad Road Police Station), भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन (Bharti Vidyapeeth Police Station), हडपसर पोलिस स्टेशन (Hadapsar Police Station), लोणी काळभोर पोलिस स्टेशन (Loni Kalbhor Police Station), लोणीकंद पोलिस स्टेशन (Lonikand Police Station), चंदनगर पोलिस स्टेशन (Chandan Nagar Police Station) आणि चतुःश्रृंगी पोलिस स्टेशनचे (Chaturshringi Police Station) लवकरच विभाजन करून नवीन पोलिस स्टेशन (New Police Station In Pune) कार्यान्वीत केली जाणार आहेत. (News Police Stations In Pune)

सिंहगड रोड पोलिस स्टेशनच्या हद्दीचे विभाजन करून नांदेड सिटी पोलिस स्टेशन (Nanded City Police Station), भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनच्या हद्दीचे विभाजन करून आंबेगाव पोलिस स्टेशन (Ambegaon Police Station) , हडपसर आणि लोणी काळभोर पोलिस स्टेशनचे विभाजन करून फुरसुंगी पोलिस स्टेशन (Fursungi Police Station) आणि काळेपडळ पोलिस स्टेशन (Kale Padal Police Station), लोणीकंद पोलिस स्टेशनचे विभाजन करून वाघोली पोलिस स्टेशन (Wagholi Police Station), चंदननगरच्या हद्दीचे विभाजन करून खराडी पोलिस स्टेशन (Kharadi Police Station) आणि चतुःश्रृंगी पोलिस स्टेशनच्या हद्दीचे विभाजन करून बाणेर पोलिस स्टेशन (Baner Police Station) अस्तित्वात येणार आहेत. (News Police Stations In Pune)

‘अ’ वर्ग दर्जाची पोलिस स्टेशनमधून लोणी काळभोर, हडपसर, लोणीकंद, सिंहगड रोड, चतुःश्रृंगी, भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनकडे पाहिजे जाते. नमुद करण्यात आलेल्या पोलिस स्टेशनच्या हद्दीतील लोकसंख्या आणि त्यांच्या लगत असलेला भाग पाहिला असता तेथे नवीन पोलिस स्टेशनची आवश्यकता जाणवत आहे. बाणेर, वाघोली, नांदेड सिटी, खराडी, काळेपडळ, फुरसुंगी, आंबेगाव यापैकी काही भागांसाठी यापुर्वी पासुनच नवीन पोलिस स्टेशन व्हावे यासाठीचे प्रस्ताव शासन दरबारी दाखल करण्यात आले आहेत. आता एकुण 7 नवीन पोलिस स्टेशनसाठी प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आले असून त्याचा पुणे पोलिस पाठपुरावा करीत आहेते.

पोलिस स्टेशनसाठी जागा, मनुष्यबळ आणि इतर बाबींसाठी जोरदार तयारी देखील सुरू करण्यात आली आहे. साधारणतः 15 ऑगस्ट पुर्वी ही सातही पोलिस स्टेशन कार्यान्वीत होणार असल्याची माहिती गृह विभागातील सुत्रांनी पोलीसनामा ऑनलाइनला (www.policenama.com) दिली आहे. दरम्यान, याबाबत पुण्याचे सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik) यांना विचारले असता त्यांनी 7 पोलिस स्टेशनचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आले असून ती लवकर कार्यान्वीत व्हावीत म्हणुन त्याचा आम्ही पाठपुरावा घेत असल्याचे सांगितले.

फुरसुंगी, काळेपडळ, वाघोली या ठिकाणी लवकरात लवकर पोलिस स्टेशन सुरू करावीत अशी मागणी स्थानिक नागरिकांनी यापुर्वी वेळोवेळी केली आहे. दरम्यान, नांदेड सिटी येथे पोलिस स्टेशन कार्यान्वीत करण्यात यावे म्हणून तेथे जागा देखील आरक्षित करण्यात आलेली आहे. वरील 7 ठिकाणांपैकी बहुतांश ठिकाणच्या लोकसंख्येचा आढवा घेतला तर तिथे स्वतंत्र पोलिस स्टेशनची आवश्यकता जाणवत आहे.

भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनच्या हद्दीत साधारण साडे पाच लाख लोक वास्तव्यास आहेत. पोलिस स्टेशनच्या हद्दीत भारती विद्यापीठ पोलिस चौकी (Bharti Vidyapeeth Police Chowki), कात्रज पोलिस चौकी (Katraj Police Chowki), आंबेगाव पठार (Ambegaon Pathar Police Chowki) पोलिस चौकी आणि दत्तनगर पोलिस चौकी (Datta Nagar Police Chowki) कार्यरत आहे. भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनचे विभाजन होवुन तिथे आंबेगाव पोलिस स्टेशन कार्यान्वीत व्हावे यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

हडपसर पोलिस स्टेशनच्या हद्दीत 5 लाख लोक वास्तव्यास आहेत. हडपसरच्या हद्दीत हडपसर पोलिस चौकी (Hadapsar Police Chowki), मगरपट्टा पोलिस चौकी (Magarpatta Police Chowki), तुकाई पोलिस चौकी (Tukai Nagar Police Chowki), फुरसुंगी पोलिस चौकी (Fursungi Police Chowki) आणि मांजरी पोलिस चौकी (Manjri Police Chowki) आहे तर लोणी काळभोर पोलिस स्टेशनच्या हद्दीत हवेली तालुक्यातील मोठा भाग आहे. त्यामुळे लोणी काळभोर आणि हडपसर पोलिस स्टेशनचे विभाजन करून तिथे फुरसुंगी पोलिस स्टेशन आणि काळेपडळ पोलिस स्टेशन कार्यान्वीत व्हावे यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

लोणीकंद पोलिस स्टेशनच्या हद्दीत साडेतीन लाख लोक वास्तव्यास आहेत.
लोणीकंदचे विभाजन करून वाघोली पोलिस स्टेशन व्हावे यासाठी प्रस्ताव दाखल आहे.
सिंहगड रोड पोलिस स्टेशनच्या हद्दीत 3 लाख लोक वास्तव्यास आहेत.
मात्र, परिसरातील लोकसंख्या झपाटयाने वाढत आहे. तिथे अभिरूची पोलिस चौकी (Abhiruchi Police Chowki),
वडगाव पोलिस चौकी (Wadgaon Police Chowki) आणि नर्‍हे पोलिस चौकी (Narhe Police Chowki)
अस्तित्वात आहे. नांदेड सिटी येथे स्वतंत्र पोलिस स्टेशन व्हावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
तसा प्रस्ताव देखील पुणे पोलिसांनी राज्य शासनाकडे सादर केला आहे.

चंदननगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत साडेचार लाख नागरिक वास्तव्यास आहेत.
तिथे महात्मा फुले पोलिस चौकी (Mahatma Phule Police Chowki), शिवराणा प्रताप पोलिस चौकी
(Shivrana Pratap Police Chowki) आणि खराडी पोलिस चौकी (Kharadi Police Chowki) सुरू आहे.
चंदननगरचे विभाजन करून खराडी येथे स्वतंत्र पोलिस स्टेशन सुरू करण्यात येणार आहे.
चतुःश्रृंगी पोलिस स्टेशनच्या हद्दीत 6 लाख नागरिक वास्तव्यास आहेत.
तिथे पांडवनगर पोलिस चौकी (Pandhav Nagar Police Chowki), जनवाडी पोलिस चौकी
(Janwadi Police Chowki), पुना गेट पोलिस चौकी (Poona Gate Police Chowki), पाषाण पोलिस चौकी
(Pashan Police Chowki) आणि औंध पोलिस चौकी (Aundh Police Chowki) सुरू आहे.
चतुःश्रृंगी पोलिस स्टेशनचे विभाजन करून बाणेर पोलिस स्टेशन सुरू करण्यासाठी सरकारकडे प्रस्ताव दाखल
करण्यात आलेला आहे.

राज्य शासनाकडे पुणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत नवीन 7 पोलिस स्टेशन सुरू करण्यासाठीच्या हालचालींना
वेग आला आहे. 15 ऑगस्टच्या पुर्वीच ही सातही पोलिस स्टेशन कार्यान्वीत केली जाणार असल्याची माहिती
गृह विभागातील (Maharashtra Home Department) सुत्रांनी दिली आहे.
मात्र, पोलिस स्टेशनसाठी जागा, मनुष्यबळ, वाहने आणि इतर सुविधांसाठी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

Web Title :   News Police Stations In Pune | Sinhagad Road, Bharti Vidyapeeth, Hadapsar, Loni Kalbhor, Lonikand, Chandnagar and Chatushringi Police Stations will be divided soon! Nanded City, Ambegaon, Fursungi, Kalepadal, Wagholi, Chandnagar and Baner police stations will be functional before August 15.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Police Transfers – DySP / ACP | पिंपरी-चिंचवडमधील सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर, ACP प्रेरणा कट्टे आणि ACP श्रीकांत डिसले यांची बदली

Jayant Patil ED Inquiry | सर्व नेत्यांचे आपल्याला फोन आले, पण अजित पवारांचा नाही; जयंत पाटलांची सूचक प्रतिक्रिया; नाराजीच्या चर्चांना उधाण (व्हिडिओ)

Ajit Pawar | ‘तू स्टँप पेपर आण, मी लिहून देतो’, ‘त्या’ प्रश्नावर अजित पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका (व्हिडिओ)

Maharashtra DySP / ACP Transfers | राज्यातील 119 पोलिस उप अधीक्षक / सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या बदल्या ! पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, पुणे ग्रामीण, पुणे एसीबीमधील अधिकार्‍यांचा समावेश