NHRC On Deaths In Govt Hospitals In Maharashtra | राज्यातील शासकीय रुग्णालयातील मृत्यूंची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने घेतली दखल, राज्य सरकार व मुख्य सचिवांना नोटीस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – NHRC On Deaths In Govt Hospitals In Maharashtra | नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात झालेल्या रुग्णांच्या मृत्यूची दखल राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने घेतली आहे. आयोगाकडून राज्य सरकार आणि मुख्य सचिव यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. रुग्णालयांना भेटी देण्यासाठी, कारणे शोधण्यासाठी आणि उपाय सुचवण्यासाठी आयोगाने आपल्या विशेष प्रतिनिधींची नियुक्ती केली आहे. (NHRC On Deaths In Govt Hospitals In Maharashtra)

नांदेड येथील शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना घडली असताना छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात रुग्णांचा मृत्यू झाला. वैद्यकीय मदतीचा आभाव आणि आवश्यक असणाऱ्या औषधांची कमतरता यामुळे या शासकीय रुग्णालयात रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप केला जात आहे.

माध्यमातील अहवालातील मजकूर खरा असल्यास, सार्वजनिक प्राधिकरणांच्या निष्काळजीपणामुळे पीडितांच्या जीवन आणि आरोग्याशी संबंधित मानवी हक्कांचे उल्लंघन आहे. ही चिंताजनक बाब आहे, असे निरीक्षण आयोगाने नोंदवले आहे. (NHRC On Deaths In Govt Hospitals In Maharashtra)

त्यानुसार महाराष्ट्र शासनाच्या मुख्य सचिवांना नोटीस बजावण्यात आली आहे. यामध्ये चार आठवड्यात या
प्रकरणाचा सविस्तर अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. त्यामध्ये पायाभूत सुविधांची स्थिती,
सरकारी रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका यासह इतर कर्मचाऱ्यांचे आवश्यक आणि सध्याचे संख्याबळ,
रुग्णांसाठी उपलब्ध औषधे, निदान सुविधांची स्थिती याचा समावेश असावा, असे आयोगाने नमूद केले आहे.

आयोगाने राज्य सरकारला त्यांच्या मुख्य सचिवांमार्फत जबाबदार लोकसेवकांवर केलेली कारवाई, पीडित कुटुंबांना
पुरवण्यात आलेली मदत, पुनर्वसनाची स्थिती यासंदर्भात माहिती देण्यास सांगितले आहे.
याशिवाय भविष्यात अशा प्रकारची दुर्दैवी मृत्यूची पुनरावृत्ती होणार नाही याची खात्री करण्यासाठी राज्य सरकारने
उचललेले किंवा प्रस्तावित केलेल्या पावलांची माहिती आयोगाला पाहिजे आहे.

https://x.com/India_NHRC/status/1709910532504084875?s=20

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Congress Mohan Joshi – Shivaji Nagar ST Stand | शिवाजीनगर एसटी स्थानक 15 दिवसात निर्णय घ्या, अन्यथा मुख्य मंत्र्यांना अडवू; माजी आमदार मोहन जोशी यांचा इशारा