NIBM Road Kondhwa Crime | पुणे : गाडीला धक्का लागल्याच्या कारणावरुन दोन गटात राडा, पोलीस अधिकाऱ्याचा महागडा मोबाईल फोडला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – NIBM Road Kondhwa Crime | चारचाकी गाडीचा धक्का लागल्याच्या कारणावरुन दोन गटात सुरु असलेली भांडणे सोडवण्यासाठी गेलेल्या सहायक पोलीस निरीक्षकाचा आयफोन हिसकावून घेऊन फोडला. हा प्रकार सोमवारी (दि.15) रात्री नऊच्या सुमारास एनआयबीएम रोडवर (NIBM Road Pune) उज्वल सोसायटी (Ujwal Park Kondhwa) समोर घडला. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police) 10 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

श्रीकांत शिवाजी राठोड (वय-23 रा. शिवनेरी नगर, कोंढवा खुर्द), अक्षय भगवान बाबर (वय-29), अतुल सुरेश जावळकर (वय-33), विघ्यम राजु पिल्ले (वय-24), शुभम राजेंद्र थोपटे(वय-28), मयुर उर्फ नाना भगवान बाबर (वय-32) अमर समीर कश्मिरी, सुफियान जावेद शेख, जावेद शेख (सर्व रा. कोंढवा) यांच्यासह इतर साथीदारांवर आयपीसी 160, 427, 143, 145, 146, 147, 149, 504, सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 110/ 117 नुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक सचिन गोरख थोरात (API Sachin Thorat) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी व त्याचे सहकारी सहायक पोलीस निरीक्षक पठाण हे लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलींग करत होते (Lok Sabha Election).
मेफऱ एलिगंझा सोसायटी (Mayfair Eleganza Kondhwa) समोरुन एनआयबीएम रोडकडे जात असताना उज्वल सोसायटी समोर काहीजण भांडण करत असल्याचे दिसले.
पथकाने त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता अदनान सलिम बेग (वय-24 रा. शिवनेरी नगर) याच्या चारचाकी गाडीचा
धक्का अमर काश्मिरी याच्या दुचाकीला लागल्याने त्यांच्यात वाद सुरु होते.

गाडीला धक्का लागल्याने वाद सुरु असताना अदनान याने त्याच्या साथीदारांना बोलावून घेतले.
तर अमर काश्मिरी याने देखील त्याच्या साथीदारांना त्याठिकाणी बोलावून घेतले.
आरोपींनी एकमेकांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली.
फिर्यादी व त्यांचे सहकारी सहायक पोलीस निरीक्षक पठाण भांडण सोडवण्याचा प्रयत्न करत होते.
त्यावेळी आरोपींनी पठाण यांचा आय फोन मोबाईल हिसकावून घेऊन रस्त्यावर आपटून फोडून 22 हजार रुपयांचे
नुकसान केले. पुढील तपास कोंढवा पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

JM Road Firing Pune | पुण्यातील जंगली महाराज रोडवर भरदिवसा हल्लेखोरांकडून व्यावसायिकावर गोळीबार करण्याचा प्रयत्न (CCTV Footage Video)

Pune Cyber Crime | सायबर चोरट्यांच्या रडारवर पुणेकर! एस्कॉर्टच्या नावाखाली तरुणाची फसवणूक