Pune Cyber Crime | सायबर चोरट्यांच्या रडारवर पुणेकर! एस्कॉर्टच्या नावाखाली तरुणाची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Cyber Crime | पुणेकर सध्या सायबर चोरट्यांच्या (Cyber Thieves) रडारवर आहेत. गेल्या काही दिवसांपासून ऑनलाइन फसवणुकीच्या (Online Cheating) घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. पुण्यातील विमाननगर परिसरात (Viman Nagar Pune) राहणाऱ्या एका तरुणाला एस्कॉर्टच्या (Escort) नावाखाली मोठी फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सायबर चोरट्यांनी बदनामी करण्याची भीती दाखून तरुणाकडून 78 हजार रुपये उकळले. (Pune Cyber Crime)

याबाबत 19 वर्षीय तरुणाने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन 92565XXXXX, 78528XXXXX या नंबरचे मोबाईल धारक पंकज भदौरिया व जगदिश (पुर्ण नाव पत्ता माहित नाही) यांच्यावर आयपीसी 419, 420, 507, 34 सह आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 11 एप्रिल रोजी सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमाननगर परिसरातील म्हाडा कॉलनीत (Mhada Colony Viman Nagar) राहणाऱ्या फिर्य़ादी तरुणाशी दोन जणांनी मोबाईलवर संपर्क साधला. पंकज भदौरिया आणि जगदीश नावाच्या आरोपींनी या तरुणाला त्याचे मॉर्फ केलेले अश्लील फोटो (Obscene Photo) टेलिग्रामवर पाठवले. त्यानंतर हेच फोटो तुझ्या आई-वडिलांना पाठवू अशी धमकी दिली.

त्यानंतर तरुणाच्या व्हॉट्सअॅपवर क्युआर कोड पाठवला. आरोपींनी तरुणाला सेक्स एस्कॉर्टची सेवा घेतल्याचे सांगितले. ती सेवा रद्द करायची असेल तर पैसे द्यावे लागतील, अशी धमकी दिली. त्यामुळे भीतीपोटी त्या तरुणाने घाबरून आरोपींना 78 हजार रुपये पाठवले.

घरातून एवढे पैसे गेल्यावर तरुणाच्या आई-वडिलांनी त्याच्याकडे चौकशी केली.
त्यानंतर त्याने घडलेला प्रकार सांगितला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने
विमानतळ पोलीस ठाण्यात (Viman Nagar Police Station) दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) सर्जेराव कुंभार (PI Sarjerao Kumbhar) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

JM Road Firing Pune | पुण्यातील जंगली महाराज रोडवर भरदिवसा हल्लेखोरांकडून व्यावसायिकावर गोळीबार करण्याचा प्रयत्न (CCTV Footage Video)

Pune Lok Sabha Election 2024 | पुणे लोकसभेसाठी अनिस सुंडके MIM चे उमेदवार; रवींद्र धंगेकरांच्या अडचणी वाढणार (Video)

Baramati Lok Sabha | बारामतीत चालंलय काय? अजितदादांच्या पाठोपाठ आता रोहित पवारांच्या मातोश्री सुनंदा पवार यांनीही घेतला उमेदवारी अर्ज

Mahavikas Aghadi (MVA) | पुण्यात गुरुवारी मविआची मोठी प्रचारसभा, प्रमुख नेत्यांची उपस्थिती, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे भरणार उमेदवारी अर्ज