निगडीमध्ये टोळक्यांचा धुडगूस; ७ वाहनांची तोडफोड

पिंपरी-चिंचवड : पाेलीसनामा ऑनलाईन

पिंपरी-चिंचवड मध्ये तोडफोड ही काही नवीन घटना नसून नेहमीचीच झाली आहे,शनिवारी रात्री दोन मित्रांचा वाद झाल्यानंतर त्याचे पडसात अजिंठा नगर येथील पुनवर्सन इमातीत उमटले ८ ते १० जणांच्या टोळक्याने लाकडी दांडक्याने ७ वाहनांची तोडफोड केली या घटनेमुळे परिसरात काहीकाळ दहशतीचे वातावरण होते.काही जनांनी तलवारी देखील बाहेर काढल्या होत्या.याप्रकरणी निगडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेचा विडिओ समोर आला आहे.

[amazon_link asins=’B07D11MDBS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6d6801c2-8d76-11e8-bba9-6b1efd2a8cdc’]

सविस्तर माहिती अशी की,संतोष पवार आणि गायकवाड(पूर्ण नाम समजू शकले नाही)हे दोघे जण मित्र आहेत.त्यांच्यात काही दिवसांपासून वाद सुरू आहेत.शनिवारी दुपारी दोघे जण समोर आले आणि त्यांच्यातील वाद पुन्हा सुरू झाला.रात्री उशिरा संतोष पवार हा गायकवाड ला मारण्यासाठी ८ ते १० जणांचे टोळके घेऊन आला होता.मात्र तो सापडला नसल्याने अजिंठा नगर येथील पुनवर्सन इमारतीतील वाहनांची तोडफोड केली यात रिक्षा,चारचाकी वाहनांचा समावेश आहे.हातात लाकडी दांडके होते,तर काही जणांनी तलवारी काढल्या होत्या,या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण होते,महिलांनी आरडाओरडा केल्याने टावाळखोरांनी काढता पाय घेतला,मात्र जाताना वाहनांची तोडफोड केली.या घटनेचा तपास निगडी पोलीस करत आहेत.