Nikki Tamboli | अभिनेत्री निक्की तांबोळीच्या एथनिक लूकने वेधले सर्वांचेच लक्ष

पोलीसनामा ऑनलाइन : अभिनेत्री निक्की तांबोळी (Nikki Tamboli) नेहमीच तिच्या लूकमुळे चर्चेत असते. बिग बॉस मधून निक्कीला जास्त प्रसिद्धी मिळाली होती. यातूनच ती प्रेक्षकांच्या घराघरात पोहचली होती. निक्कीचे अनेक हटके स्टायलिश फोटोज ती नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकताच तिने (Nikki Tamboli) शेअर केलेले एथनिक लूकमधील फोटोज सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

निक्की सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. ती तिचे अनेक फोटोज व्हिडिओज चाहत्यांसाठी सतत शेअर करत असते. निक्कीने जरी बिग बॉसची ट्रॉफी जिंकली नसली तरी ती लोकांच्या हृदयात स्वतःचे स्थान निर्माण करण्यात यश मिळवले आहे. आज निकीचे अनेक चाहते आहेत. निक्की अनेक अल्बम मधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. सध्या निक्कीने शेअर केलेले तिचे काही फोटोज सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

या फोटोमध्ये निक्कीचे (Nikki Tamboli) एथनिक लुक पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
या फोटोत निक्कीने गुलाबी आणि नारंगी रंगाचा हेवी एम्ब्रोईडर घागरा परिधान केला असून त्यासोबत तिने
सिवलेस डिझायनर ब्लाऊज कॅरी केला आहे. यावेळी तिने हेवी मेकअप देखील केला आहे.
तर डायमंडचे हेवी ज्वेलरीही तिने परिधान केले आहे. या फोटोमध्ये निक्की खूपच सोज्वळ आणि सुंदर दिसत आहे.
सध्या चाहते निक्कीच्या या फोटोला कमेंट करून कौतुक करत आहेत.
निक्कीला अनेक म्युझिक व्हिडिओ साठी सध्या साइन देखील केले जात आहे.

Web Title :- Nikki Tamboli | television nikki tamboli has now added boldness to her ethnic look flaunting her perfect figure