Chandrashekhar Bawankule | छलकपटाने सत्तेत आलेल्या सरकारचा वचपा निसर्गाने काढला, चंद्रशेखर बावनकुळेंचा विरोधकांना टोला (व्हिडिओ)

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – Chandrashekhar Bawankule | सर्वसाधारणपणे आपण समाजात वावरताना कसल्याही प्रकारचे छलकपट अथवा अन्याय होत असेल तर त्याचा वचपा निसर्ग नियमाने काढला जातो. आताच्या सरकारबाबतीत तेच घडले आहे. छलकपटाने सत्ता स्थापन केलेल्या सरकारचा वचपा निसर्गनियमाने काढला आहे. आताचे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) -देवेंद्र फडणवीस सरकार (Devendra Fadnavis Government) हे निसर्गनियमानेच आणले आहे, अशी स्तुतिसुमने चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी उधळताना विरोधकांना टोला लगावला आहे.

गत दोन ते अडीच वर्षे महाविकास आघाडीच्या सरकारचे (Mahavikas Aghadi Government) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे कोकणच्या बाबतीत फेसबुक लाइव्हव्यतिरिक्त काही करू शकले नाहीत. सत्तेत असलेले सरकार हे सद्भभावनेने वागले असते, तर पक्षाची एकंदर सरकारची कामगिरी अथवा छबी खराब झाली नसती. या दोन ते अडीच वर्षांच्या सरकारमध्ये सद्भावना नव्हतीच त्यामुळे त्या सरकारची छबी खराब झाली, असे चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी म्हटले.

 

 

 

सत्तेत असताना सरकारने प्रवास केला पाहिजे, सुसंवाद साधला पाहिजे, सत्ताधाऱ्यांना जनता जनार्दनाची नाळ
तसेच समाजमन कळले पाहिजे. एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस हे जे सरकार आहे त्यांना जनतेची एकंदरीत
समाजाची नाळ समजली आहे. नित्यमियमाने रोजच्या रोज १८ तासांपेक्षा जास्त कामे करत आहेत आणि
त्या सरकारमधील अडीच वर्षांतील मुख्यमंत्री १८ महिने मुख्यालयात कधी दिसले नाहीत, असा उपरोधिक
टोला चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधी पक्षांना लगावला.

Web Title :– Chandrashekhar Bawankule | chandrashekhar bawankule criticised thackeray government in vidhan parishad

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Gold-Silver Rate Today | सोनं खेरेदीने नवीन वर्षाचे स्वागत करण्याची सुवर्णसंधी, सोने-चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचा दर

Ajit Pawar | ‘लाड चाललेत नुसते सगळे…’ असे म्हणत अजित पवार भाजपच्या ‘या’ मंत्र्यावर संतापले, सुनावले खडे बोल

Madhura Deshpande | तब्बल 3 वर्षांनी अभिनेत्री मधुरा देशपांडे दिसणार ‘या’ मालिकेत; साकारणार ‘हि’ महत्त्वाची भूमिका