निर्भया केस : दोषींना फाशी झाल्यानंतर अभिनेत्री तापसी पन्नूनं केलं ‘Tweet’

पोलीसनामा ऑनलाइन –  2012 साली झालेल्या निर्भया गँगरेप प्रकरणातील निर्भयाला 7 वर्षे, 3 महिने आणि 3 दिवसानंतर न्याय मिळाला आहे. प्रत्येक नागरिक आज आनंद व्यक्त करताना दिसत आहे. अनेकजण सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करताना दिसत आहेत. अशात आपल्या बिंधास्त वक्तव्यासाठी फेमस असणारी अभिनेत्री तापसी पन्नू हिनं यावर आपली रिअ‍ॅक्शन दिली आहे. सध्या तिची प्रतिक्रिया सोशल मीडियावर चर्चेत आहे.

ट्विटरवर ट्विट करत तापसी पन्नू म्हणते, “अखेर न्याय मिळाला. मला आशा आहे की, आता तिचे आई वडिल अनेक वर्षांनंतर चांगली झोप घेऊ शकतील. त्यांच्यासाठी ही एक मोठी लढाई होती.” तापसी पन्नूचं हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. तिचे अनेक चाहते तिच्या या ट्विटवर कमेंट करत आपल्या भावना मांडताना दिसत आहेत. अनेक नेटकऱ्यांनी हे ट्विट लाईक आणि शेअरही केलं आहे.

https://www.instagram.com/p/B90o6yMhGG1/

निर्भया केसमधील चारदी दोषी विनय, अक्षय, मुकेश आणि पवन गुप्ता यांना आजच(शुक्रवार दि 20 मार्च 2020) सकाळी 5.30 मिनिटांनी फासावर लटकवण्यात आलं आहे. 7 वर्षे 3 महिने आणि 3 दिवस सलग न्यायासाठी हाक देणाऱ्या निर्भयाच्या आईनं अखेर आपली लढाई जिंकली आहे. या भयानक कृत्यासाठीच हीच शिक्षा योग्य आहे.

https://www.instagram.com/p/B8d4Gx-hSoC/

https://www.instagram.com/p/B98Ye3mJnCe/

https://www.instagram.com/p/B92AeCShdRH/

https://www.instagram.com/p/B912XK6J2Qs/

https://www.instagram.com/p/B92zn3-BlXF/

https://www.instagram.com/p/B91aNWYBwFm/